CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक ६० मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 12:52 AM2020-09-17T00:52:28+5:302020-09-17T00:54:01+5:30
जिल्ह्यात कोरोना संक्रमणासह रुग्णांचा मृत्यूदरही सतत वाढत आहे. बुधवारी सर्वाधिक ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात आधी पाचवेळा ५० व त्यावर मृत्यू झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात कोरोना संक्रमणासह रुग्णांचा मृत्यूदरही सतत वाढत आहे. बुधवारी सर्वाधिक ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या महिन्यात आधी पाचवेळा ५० व त्यावर मृत्यू झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी ५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील ३७, ग्रामीणमधील १४ तर, जिल्ह्याबाहेरच्या ९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १,८१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील १,३५८, ग्रामीणमधील २९१ तर, जिल्ह्याबाहेरच्या १६६ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी २,०५२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात शहरातील १,६२६, ग्रामीणमधील ४१७ तर, जिल्ह्याबाहेरच्या ९ रुग्णांचा समावेश आहे. यासह कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ हजार ४८२ झाली. त्यात शहरातील ४५ हजार ५८८, ग्रामीणमधील ११ हजार ५४६ तर, जिल्ह्याबाहेरच्या ३४८ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत ८,२१६ (शहर-५,८१८, ग्रामीण-२,३९८) नमुने तपासण्यात आले.
अॅन्टिजेन चाचणीत ८०४ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४,००७ नमुन्यांची अॅन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील ८०४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत ६०६, एम्समध्ये ५६, मेडिकलमध्ये २६२, मेयोमध्ये १५५, माफसूमध्ये १४३ तर, नीरीमध्ये २६ नमुने पॉझिटिव्ह आले.
१,५०४ रुग्ण बरे झाले
जिल्ह्यातील १,५९४ कोरोना रुग्ण बुधवारी बरे झाले. त्यात शहरातील १,४३१ तर, ग्रामीणमधील १६३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ४३ हजार ९२७ रुग्ण (शहर-३५,७८७, ग्रामीण-८,१४०) बरे झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर ७६.४२ टक्के झाला आहे.
या दिवशी ५० वर मृत्यू
२५ ऑगस्ट ५२
६ सप्टेंबर ५४
७ सप्टेंबर ५०
९ सप्टेंबर ५९
१० सप्टेंबर ५८
११ सप्टेंबर ५३
१६ सप्टेंबर ६०
सध्या भरती असलेले कोरोना रुग्ण - ११ हजार ७४०
कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ४३ हजार ९२७
मृत्यू झालेले कोरोना रुग्ण - १,८१५