CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 12:14 AM2020-09-20T00:14:36+5:302020-09-20T00:15:55+5:30

जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur: Comfortable! In Nagpur, 49,946 patients were cured | CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे

CoronaVirus in Nagpur : दिलासादायक! नागपुरात ४९,९४६ रुग्ण बरे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमाण ८० टक्के : १,६२९ रुग्ण पॉझिटिव्ह, ५२ रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला असला तरी ७९.८८ टक्केरुग्ण बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवारी १५५० बरे झालेल्या रुग्णांची भर पडल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४९,९४६ वर पोहचली आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोना बरा होत असल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांनंतर पुन्हा रुग्णसंख्येत आज घट दिसून आली. १,६२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, मात्र ५२ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ६२,५३१ तर मृतांची संख्या १,९९२ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात या आठवड्यातील १६ तारखेला आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे, २०५२ नव्या रुग्णांची भर पडली. मात्र त्यानंतर दोन दिवस १७०० तर आज १६००वर रुग्णांची नोंद झाली. रुग्णवाढीचा वेग कमी होत असून रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. आतापर्यंत शहरात एकूण ४९,६८२, ग्रामीणमध्ये १२,४८८ तर जिल्ह्याबाहेरील ३६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ४०,९३६, ग्रामीणमध्ये ९०१० रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत मेयो, मेडिकल, एम्स, शासकीय कोविड सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये १०,५९३ रुग्ण उपचाराखाली आहेत.

६,८५४ चाचणीतून ५,२२५ रुग्ण निगेटिव्ह
आज रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही मिळून ६,८५४ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ५,२२५ रुग्ण निगेटिव्ह आले. ३,५१५ अ‍ॅन्टिजन चाचणीतून ४०७ रुग्ण पॉझिटिव्ह तर ३,१०८ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एम्समधील १११, मेडिकलमधील १७२, मेयोमधील २७२, नीरीमधील २३८ तर खासगी लॅबमधील ४२९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३,९३,३५५ रुग्णांच्या चाचण्या झाल्या आहेत.

मेयोमध्ये १३९ तर मेडिकलमध्ये १८७ खाटाच
जिल्हा माहिती कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ४१३ तर मेयोमध्ये ४६१ रुग्ण भरती असल्याची नोंद होती. या दोन्ही रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी प्रत्येकी ६०० खाटांचीच सोय आहे. यावरून मेडिकलमध्ये १८७ तर मेयोमध्ये १३९ खाटा रिकाम्या आहेत. ही दोन्ही रुग्णालये फुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत. सध्याच्या स्थितीत खासगी हॉस्पिटलसह कोविड केअर सेंटरमध्ये ५,३१४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये ५,२७९ रुग्ण आहेत.

संघ मुख्यालयातही कोरोना
शहरात कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढत आहे. कोरोना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयातही पोहोचला. मुख्यालयात राहत असलल्या ९ स्वयंसेवकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संघाचे सहप्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी याची पुष्टी करीत सांगितले की, सर्वांच्या क्वारंटाईनची व्यवस्था इतर ठिकाणी करण्यात आली आहे. ज्या स्वयंसेवकांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्वयंसेवकांमध्ये बहुतांश स्वयंसेवक ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. या संघ मुख्यालयात संघप्रमुख डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी हेसुद्धा राहतात. परंतु ते दोघेही शहराबाहेर आहेत. भागवत सध्या भोपाळमध्ये आहेत. रविवारी ते नागपुरात येण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, पॉझिटिव्ह आढळून आलेल्या स्वयंसेवकांमध्ये काहींना कोरोनाची विशेष लक्षणे नाहीत. त्यांना संघ मुख्यालयाबाहेर सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. संघ मुख्यालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी दिल्लीतील कार्यालयातील दोन वरिष्ठ पदाधिकारीही पॉझिटिव्ह आले होते. आता ते दोघेही बरे होऊन पुन्हा कामाला लागले आहेत.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित : ६,८५४
बाधित रुग्ण : ६२,५३१
बरे झालेले : ४९,९४६
उपचार घेत असलेले रुग्ण : १०,५९३
मृत्यू : १,९९२

Web Title: CoronaVirus in Nagpur: Comfortable! In Nagpur, 49,946 patients were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.