CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा घट, १५९ रुग्ण, ८ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 09:50 PM2020-11-07T21:50:23+5:302020-11-07T21:51:55+5:30

Coronavirus positive decline again , Nagpur news दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मंगळवारी पुन्हा घट आली. मागील सात दिवसांपासून जवळपास २५० ते ३००वर नोंद होत असलेली रुग्णसंख्या आज १५९ वर स्थिरावली.

CoronaVirus in Nagpur: Coronavirus decline again | CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा घट, १५९ रुग्ण, ८ मृत्यूची नोंद

CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये पुन्हा घट, १५९ रुग्ण, ८ मृत्यूची नोंद

Next
ठळक मुद्दे ३०८ रुग्ण बरे, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दररोज आढळून येणाऱ्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत मंगळवारी पुन्हा घट आली. मागील सात दिवसांपासून जवळपास २५० ते ३००वर नोंद होत असलेली रुग्णसंख्या आज १५९ वर स्थिरावली. रुग्णांची एकूण संख्या १०४६६८ झाली. ८ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३४६४वर पोहचली. नव्या रुग्णांच्या दुप्पट, ३०८ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाºयांची संख्या ९७८०६ झाली असून याचे प्रमाण ९३.४४ टक्के आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची संख्या नियंत्रणात येत आहे. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी दोन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवे आवाहन उभे ठाकले होते. परंतु मेयो, मेडिकलसह जिल्हा प्रशासनाने व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाने कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊ पाहत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १३५, ग्रामीण भागातील २१ तर जिल्हाबाहेरील ३ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीण भागातील ३ तर जिल्हाबाहेरील ३ मृतांचा समावेश आहे. िवशेष म्हणजे, २८ जुलै रोजी १५१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती, त्यानंतर चार म िहन्यानंतर आज ही रुग्णसंख्या आढळून आली.

४२८२ चाचण्यांमधून ४१२३ चाचण्या निगेटिव्ह

शहर आणि ग्रामीणमधील २५८२ संशयीत रुग्णांची आरटीपीसीआर, तर १७०० संशयित रुग्णांची रॅपीड अँटिजेन असे ४२८२ चाचण्या झाल्या. यातील ४१२३ चाचण्या निगेटिव्ह आल्या. विशेष म्हणजे, १७०० अँटिजेन चाचणीतून १५ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. खासगी लॅबमधून २७, एम्समधून ६, मेडिकलमधून १७, मेयोमधून ४७, माफसूमधून २३, नीरीमधून १० तर नागपूर विद्यापीठ प्रयोशाळेमधून १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित : ५२८२

बाधित रुग्ण : १०४६६८

बरे झालेले : ९७८०६

उपचार घेत असलेले रुग्ण : ३३९८

 मृत्यू : ३४६४

Web Title: CoronaVirus in Nagpur: Coronavirus decline again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.