CoronaVirus in Nagpur : मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट : २५३० रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:37 PM2021-05-10T23:37:21+5:302021-05-10T23:38:23+5:30

CoronaVirus Nagpur news नागपूर जिल्ह्यात कोरोनाला घेऊन दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. १६ मार्चनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांची संख्या तीन हजारांखाली आली. सोमवारी २,५३० नवे रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,५१,६०५ तर मृतांची संख्या ८,१९३ झाली आहे.

CoronaVirus in Nagpur: First major decline in morbidity since March: 2530 patients and 51 deaths | CoronaVirus in Nagpur : मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट : २५३० रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद

CoronaVirus in Nagpur : मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत मोठी घट : २५३० रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद

Next
ठळक मुद्देचाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाला घेऊन दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. १६ मार्चनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांची संख्या तीन हजारांखाली आली. सोमवारी २,५३० नवे रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,५१,६०५ तर मृतांची संख्या ८,१९३ झाली आहे. विशेष म्हणजे ३५ दिवसांनंतर मृतांची संख्या ५० वर आली आहे. आज १५,३१० चाचण्या झाल्या. परंतु जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत असताना मेयो, मेडिकल व एम्समध्ये रुग्णांची संख्या अद्यापही कायम आहे. एम्समध्ये १९१, मेयोमध्ये ४६० तर मेडिकलमध्य ८३३ रुग्ण उपचारासाठी आहेत. कोविड हेल्थ सेंटर असलेल्या मनपाच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये २७, पाचपावली सेंटरमध्ये ३७, तर इंदिरा गांधी रुग्णालयात ६७ रुग्ण उपचार घेत आहेत. मोठे खासगी कोविड रुग्णालये सोडल्यास छोट्या रुग्णालयांत रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. सोमवारी ९,७८१ रुग्ण भरती होते. तर, ४१,३६२ रुग्ण होम आयसालेशनमध्ये होते.

शहरात पॉझिटिव्हिटिचा दर ११ टक्के, तर ग्रामीणमध्ये ३४ टक्के

शहरात आज ११,९९९ चाचण्या झाल्या. यातून १,३७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हिटीचा दर ११.४२ टक्के आहे. ग्रामीणमध्ये ३,३११ चाचण्या झाल्या. यातून १,१४९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. पॉझिटिव्हिटीचा हा दर ३४.७० टक्के आहे. यावरून ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाने अधिक काम करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

रुग्णसंख्येच्या तुलनेत ४१ टक्के रुग्ण बरे

३० एप्रिल ते १० मे या ११ दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक रुग्ण बरे होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी २,५३० रुग्ण आढळून आले असताना ४१ टक्के म्हणजे ६,०६८ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ८६.८६ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत ३,९२,२६९ रुग्ण बरे झाले आहेत.

असे झाले रुग्ण बरे

३० एप्रिल : ६,४६१ रुग्ण : ७,२९४ बरे

१ मे : ६,५७६ रुग्ण : ७,५७५ बरे

२ मे : ५,००७ रुग्ण : ७,५९९ बरे

३ मे : ४,९८७ रुग्ण : ६,६०१ बरे

४ मे : ४,१८२ रुग्ण : ७,३४९ बरे

५ मे : ४,३९९ रुग्ण : ७,४०० बरे

६ मे : ४,९०० रुग्ण : ६,३३८ बरे

७ मे : ४,३०६ रुग्ण : ६,५२६ बरे

८ मे : ३,८२७ रुग्ण : ७,७९९ बरे

९ मे : ३,१०४ रुग्ण : ६,५४४ बरे

१० मे : २,५३० रुग्ण : ६,०६८ बरे

 कोरोनाची सोमवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १५,३१०

ए. बाधित रुग्ण : ४,५१,६०५

सक्रिय रुग्ण : ५१,१४३

बरे झालेले रुग्ण :३,९२,२६९

मृत्यू : ८,१९३

Web Title: CoronaVirus in Nagpur: First major decline in morbidity since March: 2530 patients and 51 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.