CoronaVirus in Nagpur : कोरोनाच्या रुग्णात चढउतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 11:28 PM2021-07-29T23:28:26+5:302021-07-29T23:28:56+5:30

CoronaVirus कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा चढउतार दिसून येत आहे.

CoronaVirus in Nagpur: Fluctuations in corona virus | CoronaVirus in Nagpur : कोरोनाच्या रुग्णात चढउतार

CoronaVirus in Nagpur : कोरोनाच्या रुग्णात चढउतार

googlenewsNext
ठळक मुद्दे१० रुग्णांची भर : १९५ बाधित सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी मागील चार-पाच दिवसांपासून पुन्हा चढउतार दिसून येत आहे. गुरुवारी १० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८५२ झाली. दोन दिवसांपासून मृत्यूची नोंद नसल्याने मृतांची संख्या १०,११६वर स्थिरावली आहे.

कोरोनाचा रुग्णसंख्येसोबतच त्याची भीतीही कमी होताना दिसून येत आहे. परिणामी, मास्क, सॅनिटायझेशन व फिजीकल डिस्टंन्सिगचा नियमाला बगल देण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा धोका होण्याची शक्यता, आहे. गुरुवारी शहरात ४,५८९ तर ग्रामीणमध्ये १,१६८ असे एकूण ५,७५७ चाचण्या झाल्या. यातून शहरात ६ तर ग्रामीणमध्ये ४ रुग्ण आढळून आले. आज २३ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८२,५४१ झाली. सध्या १९५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

मेडिकलमध्ये १४, एम्समध्ये ३ तर मेयोत २ रुग्ण

कोरोनाचा रुग्णांसाठी मेडिकलमध्ये ९००, मेयोत ६०० तर एम्समध्ये २५० बेडची सोय करण्यात आली होती. मार्च व एप्रिल महिन्यात या रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. परंतु प्रादुर्भाव कमी होताच हेच बेड ‘नॉन कोविड’ रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या मेडिकलमध्ये १४, एम्समध्ये ३ तर मेयोत केवळ २ रुग्ण उपचाराखाली आहेत.

 कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ५,७५७

शहर : ६ रु ग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,८५२

ए. सक्रिय रुग्ण : १९५

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,५४१

ए. मृत्यू : १०,११६

Web Title: CoronaVirus in Nagpur: Fluctuations in corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.