CoronaVirus in Nagpur : आजाराची माहिती लपवल्याने अनेकांचा जीव धोक्यात  : नागपुरातील जरीपटका परिसरात दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 01:04 AM2020-04-01T01:04:40+5:302020-04-01T01:05:55+5:30

जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी पुढे आल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला. बेजबाबदार रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

CoronaVirus in Nagpur: Hiding information about the disease puts many lives at risk: Panic in Jharpatka area of Nagpur | CoronaVirus in Nagpur : आजाराची माहिती लपवल्याने अनेकांचा जीव धोक्यात  : नागपुरातील जरीपटका परिसरात दहशत

CoronaVirus in Nagpur : आजाराची माहिती लपवल्याने अनेकांचा जीव धोक्यात  : नागपुरातील जरीपटका परिसरात दहशत

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाचा असाही बेजबाबदारपणा : मनपाची यंत्रणा सतर्क झाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका येथील एका रुग्णाने तो कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याची माहिती लपवून खासगी जनता हॉसिपटलमध्ये उपचार घेतले; नंतर मेडिकलच्या सामान्य वॉर्डात उपचार घेतले. त्यामुळे हा रुग्ण, डॉक्टरांसह इतर अनेकांच्या संपर्कात आला. त्याला कोरोना असल्याचे रविवारी पुढे आल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला. बेजबाबदार रुग्ण व त्याच्या नातेवाईकांमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.
रुग्णावर उपचार करणाऱ्या नऊ डॉक्टरांसह इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले आहे. तसेच त्याची पत्नी व मुलीलाही या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णाने कोरोनाग्रस्त असल्याचे लपवले. त्याची प्रकृती खालावल्यावर प्रथम जरीपटक्यातील जनता हॉस्पिटल गाठले. येथे उपचारादरम्यान त्याला एमआरआयसाठी एका खासगी केंद्रात पाठवले गेले. येथे तपासणी केल्यावर या रुग्णाने शनिवारी मध्यरात्री मेडिकल गाठले. आकस्मिक विभागातील डॉक्टरांनी विचारणा केल्यावरही रुग्णाने त्याचा कोरोनाशी संबंधित व्यक्तीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याला श्वास घ्यायला त्रास, पक्षाघात झाल्याने सामान्य वॉर्डात दाखल करण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसल्यावर त्याचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. रविवारी त्याचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर त्याने त्याचा भाऊ व पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. दरम्यान, त्याच्या संपर्कात आल्याने येथील नऊ डॉक्टर, आठ परिचारिका, तीन आंतरवासिता डॉक्टर यांना खबरदारी म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
रुग्णाच्या या बेजबाबदारपणामुळे जरीपटका भागातील नागरिकात दहशत पसरली. महापालिका प्रशासन सतर्क झाले. जरीपटका परिसरात निर्जंतुकीकरणाची माोहीम हाती घेतली. सोमवारी जनता हॉस्पिटल सील करण्याात आले.

जीवनावश्यक वस्तू घरपोच पाठविण्याला प्राध्यान्य
पाच कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण परिसराला लॉकडाऊन करण्यात आले. परिसरातील बहुतांश नागरिक एकमेकांचे परिचित व संपर्कातील असल्याने जीवनावश्यक तसेच गरजेचे साहित्य घरपोच पाठविण्यास प्राधान्य दिले जात आहे. ‘कम्युनिटी स्प्रेड’ टाळण्यासाठी प्रभागाचे नगरसेवक व आरोग्य समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी नागरिकांना जीवनावश्यक सामान घरीच मागवून घेण्यास सांगितले.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Hiding information about the disease puts many lives at risk: Panic in Jharpatka area of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.