CoronaVirus in Nagpur : भयावह ! नागपुरात ४६ मृत्यूची नोंद : ९८९ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 11:10 PM2020-08-20T23:10:40+5:302020-08-20T23:12:28+5:30

ऑगस्ट महिन्यात रुग्ण व मृत्यूसंख्येचे जुने विक्रम मोडीत निघत आहेत. बुधवारी रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना गुरुवारी मृत्यूसंख्येची सर्वाधिक नोंद झाली. एकाच दिवशी ४६ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या ६२५ वर पोहचली. ९८९ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १७,७२२ झाली.

CoronaVirus in Nagpur: Horrible! 46 deaths recorded in Nagpur: 989 new patients added | CoronaVirus in Nagpur : भयावह ! नागपुरात ४६ मृत्यूची नोंद : ९८९ नव्या रुग्णांची भर

CoronaVirus in Nagpur : भयावह ! नागपुरात ४६ मृत्यूची नोंद : ९८९ नव्या रुग्णांची भर

Next
ठळक मुद्दे ११७ ग्रामीण भागातील तर ८७२ शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्यात रुग्ण व मृत्यूसंख्येचे जुने विक्रम मोडीत निघत आहेत. बुधवारी रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना गुरुवारी मृत्यूसंख्येची सर्वाधिक नोंद झाली. एकाच दिवशी ४६ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची एकूण संख्या ६२५ वर पोहचली. ९८९ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १७,७२२ झाली. यात ग्रामीणमधील ४,३३०, शहरातील १३,३९२ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद ७ ऑगस्ट रोजी झाली होती. ४० रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर आठवडाभरातच मृतांची संख्या त्याच्यावर गेली. परिणामी, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मेयोमध्ये आज १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वात कमी वयाचा ३७ वर्षीय पुरुष आहे. उर्वरितांमध्ये ५२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ६३ वर्षीय पुरुष, ६४ वर्षीय महिला, ६५ वर्षीय दोन महिला, ७१ वर्षीय महिला व पुरुष, ७५ वर्षीय महिला, ८४ वर्षीय पुरुष व ८५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. मेडिकलमध्ये ४० वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष व ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित मृतांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून उपलब्ध झालेली नाही. आज मृतांमध्ये ग्रामीण भागातील चार, शहरातील ३८ तर जिल्ह्याबाहेरील चार होते.

अ‍ॅन्टिजेन चाचणीत ३६० रुग्ण पॉझिटिव्ह
अ‍ॅन्टिजन चाचणीची संख्या वाढताच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली. आज ३६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोने केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत १९०, मेडिकलमध्ये २१, एम्समध्ये १३६, नीरीमध्ये एक, माफसूमध्ये ३८, खासगी लॅबमध्ये २४३ असे एकूण ९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ११७ ग्रामीण भागातील तर ८७२ शहरातील रुग्ण आहेत. कोरोनाबाधित असलेले २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७,६३६ वर पोहचली. सध्या ८,४३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

दैनिक संशयित : ४,९००
बाधित रुग्ण : १७,७२२
बरे झालेले : ७,६३६
उपचार घेत असलेले रुग्ण : ८,४३३
मृत्यू : ६२५

Web Title: CoronaVirus in Nagpur: Horrible! 46 deaths recorded in Nagpur: 989 new patients added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.