Coronavirus in Nagpur; ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या डाॅक्टरांचा मानवीय उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 07:30 AM2021-04-29T07:30:00+5:302021-04-29T07:30:10+5:30
Nagpur News युनायटेड किंगडम (यूके)मधील ब्रिटिश असाेसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ)च्या वतीने मानवीयतेचा परिचय देत नागपूरमधील किंग्सवे हाॅस्पिटल आणि याअंतर्गत हाॅटेल सेंटर पाॅइंटस्थित काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युनायटेड किंगडम (यूके)मधील ब्रिटिश असाेसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजीन (बीएपीआयओ)च्या वतीने मानवीयतेचा परिचय देत नागपूरमधील किंग्सवे हाॅस्पिटल आणि याअंतर्गत हाॅटेल सेंटर पाॅइंटस्थित काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला आहे. संघटनेतर्फे उपचार करणाऱ्या सल्लागारांशी संवाद साधण्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांसाेबत वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आभासी तपासणी आणि गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांशी ऑनलाइन मार्गदर्शनाची तयारीही दर्शविण्यात आली आहे.
विषाणूमुळे पीडित असलेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य व तत्सम मदत पुरविण्याची ग्वाही संघटनेने दिली आहे. बीएपीआयओचे सचिव, सीक्यूसीचे तज्ज्ञ मार्गदर्शक व आंतस्रावी सल्लागार प्रा. पराग सिंगल यांनी बीएपीआयओचे अध्यक्ष डाॅ. रमेश मेहता यांच्या सहकार्याने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. किंग्सवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. राजकुमार खंडेलवाल आणि डाॅ. प्रकाश खेतान हे समन्वयक म्हणून कार्य सांभाळत असून बीएपीआयओ आणि बीटीएकडून मिळणारी मदत रुग्णांपर्यंत पाेहोचविण्यासाठी झटत आहेत.