CoronaVirus in Nagpur : अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 10:40 PM2020-12-19T22:40:07+5:302020-12-19T22:41:31+5:30

Increase in active corona viruses, nagpur newsमागील चार दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना शनिवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६००१ वर पोहचली.

CoronaVirus in Nagpur: Increase in active corona viruses | CoronaVirus in Nagpur : अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांमध्ये वाढ

CoronaVirus in Nagpur : अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधितांमध्ये वाढ

Next
ठळक मुद्दे६००१ रुग्ण क्रियाशील : ३९८ नवे रुग्ण, ९ मृत्यू

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मागील चार दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना शनिवारी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६००१ वर पोहचली. हा दर ५ टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे, १ डिसेंबर रोजी हाच दर ४ टक्क्यांवर होता. आज ३९८ नव्या रुग्णांची भर पडली, तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १,१९,६१९ तर मृतांची संख्या ३,८४१ झाली.

नागपूर जिल्ह्यात दिवाळीपूर्वी, १२ नोव्हेंबर रोजी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,४९८ होती. याचे प्रमाण ३ टक्के होते. १ डिसेंबरपर्यंत या रुग्णांची संख्या वाढून ५,०३३ वर पोहचली. याचे प्रमाण ४ टक्के होते. सध्या ६००१ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १,३६१ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात दाखल आहेत तर ४,६३९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आज पुन्हा कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या कमी झाल्या. एकूण ४,३१६ चाचण्यांमधून ३,७९९ आरटीपीसीआर तर ५१७ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीतून २९ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३६९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये शहरातील ३२३, ग्रामीणमधील ७१ तर जिल्ह्याबाहेरील ४ आहेत. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील २ तर जिल्ह्याबाहेरील ४ आहेत. आज ३७१ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १,०९,७७७ वर गेली आहे.

मेडिकलमधून गृह विलगीकरणात १,५२९ रुग्ण

मेडिकलमधून आतापर्यंत १,५२९ रुग्णांना गृह विलगीकरणात म्हणजे होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले. या शिवाय, मेयोने १२३०, एम्सने २६५, व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमधून ३५५, पाचपावली कोविड केअर सेंटरमधून २६९ रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. सध्या शहरातील ५,१२७ तर ग्रामीणमधील ८७४ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.

दैनिक संशयित : ४,३१६

बाधित रुग्ण : १,१९,६१९

बरे झालेले : १,०९,७७७

 उपचार घेत असलेले रुग्ण : ६००१

 मृत्यू : ३,८४१

Web Title: CoronaVirus in Nagpur: Increase in active corona viruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.