CoronaVirus in Nagpur : जिल्ह्यात संक्रमण दर ०.४२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 12:37 AM2021-06-23T00:37:33+5:302021-06-23T00:38:27+5:30
Coronavirus, Nagpur news नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ७०४१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ३० नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानुसार जिल्ह्यात मंगळवारी ०.४२ टक्के संक्रमण दराची नोंद झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ७०४१ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ३० नमुने पॉझिटिव्ह आले. त्यानुसार जिल्ह्यात मंगळवारी ०.४२ टक्के संक्रमण दराची नोंद झाली.
दोन दिवसांपासून शहरात बाजार, दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू झाली आहेत. वेळी प्रशासनाचे लक्ष संक्रमण दरासह नवीन रुग्णांवर आहे. नागपुरात चार दिवसांनंतर कोविडने मंगळवारी दोन संक्रमितांचा मृत्यू झाला आहे, तर ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेर कुणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४७६८२४ संक्रमित मिळाले असून ९०२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी संक्रमितांमध्ये शहरातील १८ आणि ग्रामीणमध्ये १२ संक्रमित आहेत. आज १२० रुग्ण स्वस्थ बनले आहेत. यामध्ये शहरातील ७५ आणि ग्रामीणच्या ४५ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ४६७००३ संक्रमित स्वस्थ बनले आहेत. रिकव्हरी दर ९७.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मंगळवारी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील ५००१ आणि ग्रामीणचे २०४० जण आहेत. आतापर्यंत ३०.०५ लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
सक्रिय रुग्ण ७१०
नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एप्रिलच्या अखेरीस जवळपास ७७ हजार सक्रिय रुग्ण होते, तर २२ जूनला ही संख्या केवळ ७१० आहे. रुग्ण बरे होण्याचा दर चांगला असल्याने संक्रमित कमी झाले आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये शहरात ६४७ आणि ग्रामीणमध्ये ६३ जण आहेत. विभिन्न सरकारी व खासगी रुग्णालयात २०० रुग्ण उपचार घेत आहेत, तर ५१० होम आयसोलेशनमध्ये आहेत.