CoronaVirus in Nagpur : संशयितांचे नमुने तपासण्यासाठी 'माफसु'चा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 08:13 PM2020-04-04T20:13:24+5:302020-04-04T20:31:59+5:30

कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे.

CoronaVirus in Nagpur: 'Mafasu' initiative to test suspects' samples | CoronaVirus in Nagpur : संशयितांचे नमुने तपासण्यासाठी 'माफसु'चा पुढाकार

CoronaVirus in Nagpur : संशयितांचे नमुने तपासण्यासाठी 'माफसु'चा पुढाकार

Next
ठळक मुद्देनमुने तपासण्याची गती वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सामाजिक जाणिवेतून विद्यापीठाने सकारात्मक पाऊल उचलले आहे . त्यानुसार उपरोक्त प्रयोगशाळेत आता चाचण्या करण्यात येतील.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या सेंटर फॉर झोनोसीस, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे सदरच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. डॉ. विकास महात्मे यांचे पाठबळ व पुढाकाराने आयसीएमआर पुरस्कृत सॅटेलाईट सेंटर फॉर वन हेल्थ नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात होऊ घातले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत खा. डॉ. विकास महात्मे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आशिष पातुरकर, संचालक शिक्षण (माफसु) डॉ. ए. पी. सोमकुंवर, संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पातुरकर यावेळी उपस्थित होते. खासदार डॉ. विकास महात्मे यांना कोरोनाग्रस्तांसाठी दिलेल्या ५० लक्ष निधीच्या रकमेतून विद्यापीठ या चाचण्यांसाठी लागणाऱ्या किट घेणार आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी माफसुला आणखी मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र ठाकरे यांनी यावेळी आरोग्य यंत्रणेला दिले.
डॉ. संदीप चौधरी डॉ. वकार खान, डॉ. प्रभाकर टेंभुर्णे, डॉ. शिल्पा शिंदे व डॉ. अर्चना पाटील यांनी चाचण्या करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घेतलेले आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय कर्मचारीही या कामात मदत करणार आहेत.

कोरोना संदर्भातील बैठकीत चर्चा करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, खा. डॉ. विकास महात्मे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आशिश पातुरकर, संचालक शिक्षण (माफसु) डॉ. ए. पी. सोमकुंवर, संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर

Web Title: CoronaVirus in Nagpur: 'Mafasu' initiative to test suspects' samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.