CoronaVirus in Nagpur : नवे बाधित परत सातच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 10:49 PM2021-07-28T22:49:59+5:302021-07-28T22:50:26+5:30

CoronaVirus मंगळवारी नव्या बाधितांची संख्या दुपटीने वाढल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, बुधवारच्या अहवालानुसार, नव्या बाधितांची संख्या परत कमी झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यामध्ये सहा नवे बाधित नोंदविल्या गेले, तर परत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

CoronaVirus in Nagpur: Newly infected back within seven | CoronaVirus in Nagpur : नवे बाधित परत सातच्या आत

CoronaVirus in Nagpur : नवे बाधित परत सातच्या आत

Next
ठळक मुद्देशून्य मृत्यूची नोंद : जिल्ह्याला दिलासा, पॉझिटिव्हिटीचा दर ०.०९ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मंगळवारी नव्या बाधितांची संख्या दुपटीने वाढल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, बुधवारच्या अहवालानुसार, नव्या बाधितांची संख्या परत कमी झाली आहे. २४ तासांत जिल्ह्यामध्ये सहा नवे बाधित नोंदविल्या गेले, तर परत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या आकडेवारीमुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना, मंगळवारी दुपटीने वाढ होऊन १४ वर पोहोचली. बुधवारी मात्र यात घट झाली. २४ तासांत जिल्ह्यात एकूण ७ हजार ३१ चाचण्या झाल्या. त्यातील ६ हजार १३६ शहरी तर ८९५ ग्रामीण भागातील होत्या. शहरात पाच तर ग्रामीण भागात एक बाधित आढळला. बुधवारी २० बाधित बरे झाले. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटीचा दर ०.०९ इतका होता. विशेष म्हणजे, एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९२ हजार ८९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यातील ४ लाख ८२ हजार ५१८ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा १० हजार ११६ असून, शहरात ५ हजार ८९२ व ग्रामीणमध्ये २ हजार ६०३ मृत्यू झाले.

४७ रुग्ण रुग्णालयांत दाखल

संपूर्ण जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचे २०८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४७ ग्रामीणमधील, १५७ शहरातील व ४ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत. ४७ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत दाखल आहेत, तर उर्वरित १६१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोनाची बुधवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ७,०३१

शहर : ५ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९२,८४२

एकूण सक्रिय रुग्ण : २०८

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,५१८

एकूण मृत्यू : १०,११६

Web Title: CoronaVirus in Nagpur: Newly infected back within seven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.