CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना बाधितांची संख्या ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 09:05 PM2020-03-28T21:05:40+5:302020-03-28T22:27:34+5:30

दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या ११वर पोहचली आहे.

CoronaVirus in Nagpur: Number of corona obstructions in Nagpur 11 | CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना बाधितांची संख्या ११

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोना बाधितांची संख्या ११

Next
ठळक मुद्दे१६ वर्षाच्या मुलीसह ४० वर्षाच्या व्यक्तीला लागण- ६६ संशयित रुग्ण दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची १६ वर्षीय मुलगी तर बाधित रुग्णाच्या दुकानात काम करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या ११वर पोहचली आहे. आज दिवसभरात ६६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ सुरू असतानाही अनेक नागरिक विशेषत: तरुण वर्ग रस्त्यावर दिसून येत आहे. वसाहतीमध्ये व गल्लीबोळात दुपारी व सायंकाळी गप्पा रंगत आहेत. हे धोकादायक ठरणारे आहे. यातून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे घराबाहेर पडूच नका, असा वारंवार सल्ला डॉक्टर देत आहेत. शनिवारी आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांमधून एक ४०वर्षीय व्यक्ती गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या दुकानात काम करीत होता. शुक्रवारी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता आज त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले. १६ वर्षाची दुसरी रुग्ण बाधित रुग्णाकडे व्यवस्थापकाचे काम करणाºयाची मुलगी आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाची ही रुग्ण आहे. या दोघांना मेयोच्या वॉर्ड क्र २४ मध्ये दाखल केले आहे.
३७५ नमुने निगेटिव्ह
मेयोच्या प्रयोगशाळेला आज दिवसभरात ६२ नमुने प्राप्त झाले. यातील बहुसंख्य नमुने बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांचे व त्यांच्या वसाहतीतील नागरिकांचे आहेत. आतापर्यंत ३८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. केवळ ११ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मेयोत संशयितांचा वॉर्ड फुल्ल
बाधित रुग्णांची संख्या वाढताच संशयित रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. मेयोने बाधित रुग्णांसाठी २० खाटांचा वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी २०-२० खाटांचे वॉर्ड क्र. ४ व ६ उपलब्ध करून दिला आहे. आज दिवसभरात मेयोच्या दोन्ही संशयितांच्या वॉर्डमध्ये ३७ रुग्ण दाखल झाले आहे. यामुळे दोन्ही वॉर्ड फुल्ल आहेत. तर मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.

मेयोत ५१ संशयित रुग्ण

बाधित रुग्णांची संख्या वाढताच संशयित रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात सर्वाधिक भार मेयोवर पडला आहे. एकट्या मेयोमध्ये आज तब्बल ५१ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. रुग्ण वाढताच मेयो प्रशासनाने आणखी एक वॉर्ड उपलब्ध करून दिला आहे. आता बाधित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. २४, संशयित रुग्णांसाठी वॉर्ड क्र. ४, ५ व ६ उपलब्ध करून दिला आहे.
मेडिकलमध्ये ३२ संशयितमध्ये सहा डॉक्टरमेडिकलमध्ये ३२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यात १८ पुरुष तर १४ महिला आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांच्या वसाहतीमधीलच २० संशयित रुग्ण आहेत. शिवाय, सहा निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. वॉर्ड क्र. २५ मध्ये या सर्व संशयितांना दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: CoronaVirus in Nagpur: Number of corona obstructions in Nagpur 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.