CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली : रोज १००वर तपासले जात आहेत नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:24 AM2020-04-03T00:24:40+5:302020-04-03T00:25:32+5:30

बुधवारपासून दिल्लीसह निजामुद्दीन मरकज येथून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

CoronaVirus in Nagpur: Number of pending samples increased in Nagpur:above 100 being checked daily | CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली : रोज १००वर तपासले जात आहेत नमुने

CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली : रोज १००वर तपासले जात आहेत नमुने

Next
ठळक मुद्देमेयोच्या प्रयोशाळेवर वाढला भार

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या स्थीर झाली आहे. गेल्या तीन दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. यांच्या संपर्कात आलेल्या बहुसंख्य संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. यामुळे मेयोच्या प्रयोगशाळेवरील तपासणीचा भार कमी होण्याची शक्यता होती, परंतु बुधवारपासून दिल्लीसह निजामुद्दीन मरकज येथून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) विदर्भासह छत्तीसगड व मध्यप्रदेशातून आलेल्या कोरोना संशयिताचे नमुने तपासले जातात. नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी तीन पाळीत प्रयोगशाळा सुरू ठेवली जात आहे. यामुळेच आतापर्यंत ७६७ नमुने तपासणे शक्य झाले आहे. ३१ मार्चपासून पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नसल्याने व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रयोगशाळेवरील भार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु दिल्ली व निजामुद्दीन मरकजमधून आलेल्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताच खबरदारी यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रयोगशाळेवर नमुन्यांचा भार पडला आहे. मंगळवारी ११०, बुधवारी ९८ तर गुरुवारी १०९ तपासण्यात आले आहे. नमुने वाढल्याने तपासणीसाठी लागणारी किटचा तुटवडा पडू नये म्हणून अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया स्वत:हून लक्ष ठेवून आहेत.  नमुन्याचा अहवालाची १२ ते २४ तासांची प्रतिक्षा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या दिल्ली प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी सोडण्याचा सूचना आहेत. परंतु प्रलंबति नमुन्यांची संख्या वाढल्याने १२ ते २४ तास विलगीकरण कक्षातच थांबण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे. यातील काही प्रवाशी नमुनाचा अहवाल येण्यापूर्वीच घरी जाण्यास अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची माहिती आहे.

२४ तास प्रयोगशाळा सुरूकोरोना संशयितांचे नमुने वाढले आहेत. २४ तास प्रयोगशाळा सुरू आहे. तपासणीसाठी लागणारी किटचा तुटवडा होऊ नये म्हणून त्याचा पाठपुरावा केला जात आहे.

-डॉ. अजय केवलियाअधिष्ठाता, मेयो

Web Title: CoronaVirus in Nagpur: Number of pending samples increased in Nagpur:above 100 being checked daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.