CoronaVirus in Nagpur : चाचण्या वाढताच कोरोनाबाधितांमध्येही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:58 PM2021-01-28T23:58:01+5:302021-01-28T23:59:18+5:30

Corona Virus चाचण्यांची संख्या वाढताचा कोरोनाबाधितांमध्येही वाढ झाल्याचे गुरुवारी झालेल्या नोंदीतून सामोर आले. ५८१४ संशयित रुग्णांच्या चाचणीत ३५५ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.

CoronaVirus in Nagpur: As the number of tests increases, so does the number of coronaviruses | CoronaVirus in Nagpur : चाचण्या वाढताच कोरोनाबाधितांमध्येही वाढ

CoronaVirus in Nagpur : चाचण्या वाढताच कोरोनाबाधितांमध्येही वाढ

Next
ठळक मुद्दे३५५ रुग्ण, ६ मृत्यू : बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : चाचण्यांची संख्या वाढताचा कोरोनाबाधितांमध्येही वाढ झाल्याचे गुरुवारी झालेल्या नोंदीतून सामोर आले. ५८१४ संशयित रुग्णांच्या चाचणीत ३५५ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णांची एकूण संख्या १३३३४५ झाली; तर ६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४१४६ वर पोहोचली. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या २००च्या आत होती.

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २९८, ग्रामीणमधील ५४, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. आतापर्यंत शहरात १०५८५२, ग्रामीणमध्ये २६६२४, तर जिल्ह्याबाहेरील ८६९ रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आरटीपीसीआरच्या ३९६०, तर ग्रामीणमध्ये ११२९ असे एकूण ५०८९ चाचण्या झाल्या. रॅपिड अँटिजेनच्या शहरात ५६३, ग्रामीण भागात १६२ अशा एकूण ७२५ चाचण्या झाल्या. आरटीपीसीआरमध्ये ३०९, तर अँटिजेनमध्ये ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गुरुवारी २५० बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२५९१७ झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ९४.४३ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या ३२८२ रुग्ण उपचाराखाली आहेत.

जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू

जिल्ह्यात पहिल्या मृत्यूची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतर हळूहळू मृत्यूचे प्रमाण वाढत गेले; परंतु गुरुवारी जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच ग्रामीण भागात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. शहरात व जिल्हाबाहेर प्रत्येकी ३ असे एकूण ६ मृत्यू नोंदविले गेले. शहरात आतापर्यंत २७२१, ग्रामीणमध्ये ७३८, तर जिल्ह्याबाहेर ६८७ रुग्णांचे मृत्यू झाले.

दैनिक संशयित : ५८१४

 बाधित रुग्ण : १३३३४५

 बरे झालेले : १२५९१७

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३२८२

 मृत्यू : ४१४६

Web Title: CoronaVirus in Nagpur: As the number of tests increases, so does the number of coronaviruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.