CoronaVirus in Nagpur : आता सतरंजीपुरातील शांतिनगरही सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 01:07 AM2020-04-19T01:07:54+5:302020-04-19T01:09:10+5:30

कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

CoronaVirus in Nagpur: Shantinagar in Satranjipur now sealed | CoronaVirus in Nagpur : आता सतरंजीपुरातील शांतिनगरही सील

CoronaVirus in Nagpur : आता सतरंजीपुरातील शांतिनगरही सील

googlenewsNext
ठळक मुद्देमनपा आयुक्तांचे आदेश : प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने मनपाच्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणारे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र (सील) म्हणून घोषित करण्यात आले आहे. महापालिका उपायुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात शनिवारी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच शहरातील नागरिकांचे हित व सुरक्षेच्यासाठी संबंधित रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून सील केला जात आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा झोनअंतर्गत सतरंजीपुरा, मोमीनपुरा, तकिया, मंगळवारी झोन अंतर्गत येणारे गिट्टीखदान परिसरातील प्रभाग क्रमांक १० व १२ हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. आता शांतिनगरही सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग क्रमांक २१ शांतिनगर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील शांतिनगर घाट चौक, मुदलीयार चौक, शांतिनगर युनिव्हर्सल चौक सील करण्यात आले आहेत. उपरोक्त भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून सदर भागाच्या सीमा (हद्द) वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व परिसराच्या बाहेरच्या व्यक्तीला येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
शांतिनगरचा परिसर सील करण्यात आला असला तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहील. शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खासगी डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथालॉजिस्ट, रुग्णवाहिका इत्यादी, जीवनावश्यक वस्तूंचा सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती (पोलीस विभागामार्फत पास प्राप्त धारक) यांच्यासाठी आदेश लागू होणार नाही.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Shantinagar in Satranjipur now sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.