CoronaVirus in Nagpur : धक्कादायक : नागपुरात तपासायला नमुनेच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:36 PM2020-04-23T22:36:35+5:302020-04-23T22:38:05+5:30
नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ९८ वर पोहचली आहे. सलग सात दिवस पॉझिटिव्ह नमुने येत असताना गुरुवारी एकाही नमुन्याची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य नियंत्रणाला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु नमुनेच कमी तपासले जात असल्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहचणार कसे, हा प्रश्न विचारला जात आहे. मेयोच्या प्रयोगशाळेकडे एक जुने व एक नवे यंत्र असताना गुरुवारी दिवसा केवळ २० नमुने तपासल्याचे सांगण्यात येते. अधिक माहिती घेतली असता, त्यांच्याकडे सकाळी तपासणीसाठी नमुनेच नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. सायंकाळपर्यंत नमुने उपलब्ध झाल्याने रात्री ५७ नमुने तपासणीसाठी पाठविले. मेयो, मेडिकल व एम्स मिळून दिवसा १२२ नमुने तपासले आहेत. नागपुरात रोज ४०० वर नमुने तपासण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
१०२ नमुने निगेटिव्ह
नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत आज ५८ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ३९ नमुन्यांमधून २२ नमुने निगेटिव्ह तर आठ नमुने पॉझिटव्ह आले. आठ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. नागपुरातील तपासलेले १३ नमुनेही निगेटिव्ह आले. तर अमरावती जिल्ह्याील सहामधून तीन नमुने निगेटिव्ह तर तीन नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेयोने तपासलेले २२ तर मेडिकलने तपासलेले ४४ नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. एकूणच १२२ नमुन्यांमधून १०२ नमुने निगेटिव्ह आले.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ५५
दैनिक तपासणी नमुने १२२
दैनिक निगेटिव्ह नमुने १०२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९८
नागपुरातील मृत्यू ०१
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १५
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ११९९
क्वारंटाइन कक्षात एकूण संशयित ५२६
पीडित-९८-दुरुस्त-१५