CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोघांचा मृत्यू, १३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५१४ , मृत्यूसंख्या ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:21 PM2020-05-30T23:21:19+5:302020-05-30T23:24:27+5:30

शहरातील नव्या वसाहतींसोबतच आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यूची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दोन एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

CoronaVirus in Nagpur :Two deaths in Nagpur, 13 positive, 514 patients, 11 deaths | CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोघांचा मृत्यू, १३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५१४ , मृत्यूसंख्या ११

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोघांचा मृत्यू, १३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५१४ , मृत्यूसंख्या ११

Next
ठळक मुद्देएसआरपीएफचे दोन जवान पॉझिटिव्ह, मन्नाथखेडी, गुमगाव येथे कोरोनाचे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नव्या वसाहतींसोबतच आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यूची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दोन एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रथमच गुमगाव (ता. हिंगणा) व मन्नाथखेडी (ता. नरखेड) या गावात कोरोनाची नोंद झाली, तर भानखेडा वसाहतीमधून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपुरात रुग्णांची संख्या ५१४ झाली आहे. पाच दिवसांपूर्वी सीए रोडवरील एका ४३ वर्षीय भिकाऱ्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. त्याचे नमुने तपासले असता तो पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून तो व्हेंटिलेटरवर होता. याला न्यूमोनिया सोबतच यकृताचा गंभीर आजार होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरा मृत टेकचंदनगर, हिंगणा येथील ७३ वर्षीय आहे. या रुग्णाला मेंदूज्वर झाल्याने धंतोली येथील एका खासगी इस्पितळात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह येताच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची सुरुवातीपासून प्रकृती गंभीर होती. या रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाबासह इतरही आजार होते. सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात दोन तर मे महिन्यात नऊ मृतांची नोंद झाली आहे.

मन्नाथखेडीत दोन तर गुमगावमध्ये एक रुग्ण
कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सुरुवातीला कामठी व कन्हान पुरतेच मर्यादित होते. परंतु नंतर मुंबई व पुण्यावरून येणाऱ्यांची संख्या वाढताच ग्रामीणच्या इतरही भागात रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. आज नरखेड तालुक्यातील मन्नाथखेडी येथे ३५ वर्षीय दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. २७ मे रोजी हे दोन्ही रुग्ण मुंबईहून बसने प्रवास करीत गावात पोहचले. त्यांच्यासोबत आणखी सात जण होते. येथे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. गुरुवारी या नऊही जणांची चाचणी करण्यात आली. यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर इतरांचा अहवाल निगेटिव्ह आला. यांना मेयोमध्ये दाखल करण्यात आले. हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला.

भानखेड्यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह
मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या एका एसआरपीएफच्या जवानाची तहसील पोलीस क ॅम्पमधून मोमीनपुरा येथे ड्युटी लावण्यात आली होती. शिबिरामध्ये नमुने तपासले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ‘एम्स’च्या प्रयोगशाळेतही एसआरपीएफचा एक जवान पॉझिटिव्ह आला. या शिवाय, सतरंजीपुरा, तांडापेठ येथून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात भानखेडा येथील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले.

पाच रुग्ण कोरोनामुक्त
मेयो, मेडिकल व एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेयो येथे उपचार घेत असलेल्या मोमीनपुरा येथील एक महिला रुग्ण, एम्समध्ये उपचार घेत असलेला बुटीबोरी येथील २७ वर्षीय रुग्ण तर मेडिकलमधून गड्डीगोदाम येथून तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १९७
दैनिक तपासणी नमुने ४८२
दैनिक निगेटिव्ह नमुने ४६९
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५१४
नागपुरातील मृत्यू ११
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३७५
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २६५२
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८८९
पीडित-५१४-दुरुस्त-३७५-मृत्यू-११

Web Title: CoronaVirus in Nagpur :Two deaths in Nagpur, 13 positive, 514 patients, 11 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.