CoronaVirus in Nagpur : तीन दिवसांनंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:12 PM2021-02-27T23:12:22+5:302021-02-27T23:13:52+5:30

Coronavirus सलग तीन दिवसांपासून हजारावर जाणारी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या चवथ्या दिवशी हजाराखाली आली. शनिवारी ९८४ नव्या रुग्णांची भर पडली तर १० रुग्णांचे जीव गेले.

Coronavirus in Nagpur: Under Thousands of patients after three days | CoronaVirus in Nagpur : तीन दिवसांनंतर रुग्णसंख्या हजाराखाली

CoronaVirus in Nagpur : तीन दिवसांनंतर रुग्णसंख्या हजाराखाली

Next
ठळक मुद्दे ९८४ नव्यांची भर, १० मृत्यू : कोरोनाचे ७९३४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सलग तीन दिवसांपासून हजारावर जाणारी दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या चवथ्या दिवशी हजाराखाली आली. शनिवारी ९८४ नव्या रुग्णांची भर पडली तर १० रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १,४८,८८९ तर मृतांची संख्या ४,३३० झाली. धक्कादायक म्हणजे, १ फेब्रुवारी रोजी ३,८०८ असलेल्या कोरोनाच्या ‘अ‍ॅक्टिव्ह’ रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ७,९३४ रुग्ण सक्रिय असून यातील ५,५१६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर २,४१८ रुग्ण रुग्णालयांत आहेत.

नागपूर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना चाचण्यांचा विक्रम झाला. १३,०२७ कोरोना संशयितांच्या चाचण्या झाल्या. शुक्रवारी चाचण्यांनी उच्चांक गाठत १२,३९६ टप्पा गाठला होता. परंतु शनिवारी बाजारपेठा, कार्यालये बंद असतानादेखील चाचण्यांनी विक्रमी आकडा गाठला. यात ९,७४३ आरटीपीसीआर, ३,२८४ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ९४४ तर अँटिजेनमधून ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक चाचण्या मेयोच्या प्रयोगशाळेत झाल्या. येथे १,४३७ चाचण्यांमधून २०३, मेडिकलमध्ये १,३९३ चाचण्यांमधून २२१, एम्समध्ये ९९० चाचण्यांमधून १२८, नीरीमध्ये २६३ चाचण्यांमधून ६३, नागपूर विद्यापीठामध्ये ५७० चाचण्यांमधून ८९ तर खासगी लॅब मिळून ५,०९० चाचण्यांमधून २४० रुग्ण पॉझिटिव्ह आले.

 शहरात ७३४, ग्रामीणमध्ये २४७ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ७३४, ग्रामीणमधील २४७ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरात ६, ग्रामीणमध्ये १ तर जिल्ह्याबाहेरील ३ मृत्यू आहेत. आज ४८५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,३६,६२५ झाली आहे.

अशी वाढली सक्रिय रुग्णसंख्या

जिल्ह्यात ३१ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णसंख्या ३,७८२ होती. १० जानेवारी रोजी ४,५६२; २० जानेवारी रोजी ३,८०७; ३० जानेवारी रोजी ३,२८२; १० फेब्रुवारी रोजी ३,५४७; २० फेब्रुवारी रोजी यात वाढ होऊन ५,८३४ झाली. तर, मागील सात दिवसांत यात वाढ होऊन ७,९३४ झाली आहे. परिणामी, मेयो, मेडिकल व एम्सवर रुग्णांचा भार वाढला आहे.

 आठवड्याभरात ६,३८२ रुग्णांची भर

मागील आठवड्यात सप्टेंबरनंतरच्या दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. ६,३८२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६३ रुग्णांचे बळी गेले. मागील चार दिवसांत ४,३५५ नवे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे.

 दैनिक चाचण्या : १३,०२७

बाधित रुग्ण : १,४८,८८९

बरे झालेले : १,३६,६२५

 उपचार घेत असलेले रुग्ण : ७,९३४

मृत्यू : ४,३३०

Web Title: Coronavirus in Nagpur: Under Thousands of patients after three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.