Coronavirus: ओल्या पार्टीत पोलीस धडकले, झिंगलेल्या महिला अन् पुरुषांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:31 PM2020-04-27T16:31:34+5:302020-04-27T16:31:52+5:30
अंबाझरी गार्डन मार्गावर कॅम्पस चौकात हिल टॉप सोसायटी आहे. या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेत अक्षेपाहर्य प्रकार चालत असल्याच्या अंबाझरी पोलिसांना वारंवार तक्रारी मिळत होत्या
नागपूर : झिंगलेल्या महिला पुरुषांची ओली पार्टी रंगात आली असताना तेथे पोलीस धडकले. पार्टीच्या ठिकानी मटण, दारू सिगारेट आणि बरेच काही आक्षेपार्ह साहित्य होते. ते जप्त करून पोलिसांनी झिंगलेल्या चार पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. कॅम्पस चौकातील हिलटॉप सोसायटी मधील एका सदनिकेत रविवारी दुपारी ३ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
अंबाझरी गार्डन मार्गावर कॅम्पस चौकात हिल टॉप सोसायटी आहे. या सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेत अक्षेपाहर्य प्रकार चालत असल्याच्या अंबाझरी पोलिसांना वारंवार तक्रारी मिळत होत्या. संबंधित महिला सदनिकाधारकांना घरभाडे देत नाही आणि तिथे नेहमी तिचे मित्र मैत्रिणी येतात तसेच गैरप्रकार करतात, अशा तक्रारी सोसायटीतील सदनिका धारकांच्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडण्याची योजना बनविली. ,त्यानुसार तशा सूचना या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना पोलिसांनी दिल्या. त्यानुसार आज दुपारी तेथे गोंधळ सुरू झाल्याची माहिती वजा तक्रार एका रहिवाशाने अंबाझरी पोलिसांना दिली. त्यावरुन ठाणेदार विजय करे आपल्या सहकाऱ्यांसह दुपारी ३ च्या सुमारास सदनिकेत धडकले. यावेळी पार्टी रंगात आली होती. तेथे मटणाचा गंज, दारूची बाटली, अर्ध रिचवले गेलेले पेग आणि सिगारेट पडून होत्या. झिंगलेल्या तीन महिला आणि चार पुरुषही होते. पोलीस धडकताच हे सर्व घाबरले. आम्ही पार्टी करीत आहोत, असा युक्तिवाद त्यांनी सुरू केला. पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सर्व कसे काय एकत्रित आलात, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले। शेवटी पोलिसांसमोर नको तो प्रकार उघड झाल्यामुळे त्यांनी सोडून देण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांना अंबाझरी ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्याकडून दारूची बाटली, सिगारेटचे पाकीट तसेच अन्य आक्षेपार्ह वस्तू आणि इंडिका कार, ६ मोबाईल जप्त करण्यात आल्या आरोपींची इंडिका कार, ६ मोबाईल जप्त केले. या सर्वांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री ८ वाजता त्यांना सूचना पत्र देऊन सोडून देण्यात आले.
विशेष म्हणजे, पोलिसांनी या ओल्या पार्टीतून ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण कुख्यात गुन्हेगार आहे. तर अन्य काही जणांवरही किरकोळ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोनू उर्फ खलेश पंचांग सलामे, हर्ष नंदलाल टेंबरे, उमेश मनोज पैसाडेली आणि खुशाल भोजराज केळवदे अशी गुन्हा दाखल केलेल्या केलेल्या पुरुष आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबतच्या महिला आपल्या कुटुंबात कलह निर्माण निर्माण होईल, आमची नावे उघड करू नका, अशी विनवणी पोलिसांना करीत होत्या. पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेल्या केलेल्या कार, मोबाईल व इतर साहित्याची किंमत ३ लाख, हजार रुपये असल्याचे ठाणेदार विजय करे यांनी लोकमतला सांगितले.