Coronavirus: नागपूरच्या मेयोतून कोरोनाचे 4 संशयित रुग्ण पळाले; प्रशासनात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 10:31 AM2020-03-14T10:31:37+5:302020-03-14T10:34:34+5:30
Coronavirus: कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे.
नागपूर : पुणे, मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूरमध्ये सापडले आहेत. यामुळे नागपुरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरातील मॉल, उद्याने सिनेमागृहे बंद ठेवण्यात आली असून आज सकाळी मेयो रुग्णालयातील चार संशयित रुग्ण पळून गेल्याने मोठी खळबळ उडाली.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या नागपुरातील रुग्णाच्या पत्नी व भावाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ झाली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण नागपुरात बुधवारी आढळून आला होता. खबरदारी म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र व त्यांची तपासणी करणारे दोन डॉक्टरांसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या अशा १७ संबंधितांना तपासणीसाठी गुरुवारी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होतं. गुरुवारी रात्री उशीरा यातील १५ संबंधितांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सर्व जण निगेटीव्ह आले. परंतु त्यांच्या ४२ वर्षीय पत्नी आणि ५० वर्षीय निकटवर्तीय पॉझिटीव्ह आले अशी अधिकृत माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात प्रतिक्षा करा असे सांगितले. नागपुरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ३ झाली आहे.
Corona virus : कोरोना व्हायरसच्या इंफेक्शनमुळे असासुद्धा होतो परिणाम, जाणून 'ही' गंभीर लक्षणं....
संक्रमित अधिकाऱ्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचे स्नेहभोजन; तपासणीस नकार
अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित; युरोप बनला उद्रेकाचे केंद्र
तर शुक्रवारी दुपारी 2 च्या नंतर 4 संशयित रुग्ण मेयोत आले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. परंतु रात्रीचे 12 वाजुनही रिपोर्ट न आल्याने ते कुणाला न सांगता घरी निघून गेले. सकाळी हा प्रकार उघड झाल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. या घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा रुग्णालयात आणले जात आहे. सर्व रुग्ण नागपुरातील आहेत.