coronavirus: विदर्भात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोल्यात सर्वाधिक; गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 06:43 AM2020-08-31T06:43:55+5:302020-08-31T06:44:13+5:30

अकोला विदर्भात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. तर अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

coronavirus: Vidarbha has the highest incidence of coronavirus in Akola; Gadchiroli district is in second place | coronavirus: विदर्भात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोल्यात सर्वाधिक; गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानी

coronavirus: विदर्भात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण अकोल्यात सर्वाधिक; गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानी

Next

अकोला : विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून, त्या पाठोपाठ अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा क्रमांक लागतो. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर अकोला जिल्ह्याचा आहे. अकोल्यातील एकूण रुग्णसंख्येच्या ८१.३६ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
अकोला विदर्भात कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या अखेरनंतर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर झपाट्याने वाढू लागला. तर अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
मृत्यूदराच्या बाबतीत मात्र स्थिती तेवढीच चिंताजनक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.९३ आहे. सर्वात कमी ०.८ टक्के मृत्यूदर चंद्रपूर जिल्ह्याचा आहे.
 
Web Title: coronavirus: Vidarbha has the highest incidence of coronavirus in Akola; Gadchiroli district is in second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.