Coronavirus: विदर्भात मजुरांच्या परतीचे घोडे पैशांसाठी अडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 03:40 AM2020-05-09T03:40:49+5:302020-05-09T03:41:01+5:30
प्रामुख्याने बांधकाम, पॉवरलूम, हॉकर्स, दागिने घडविणारे व काखान्यातील कंत्राटी कामगारांचा यात समावेश आहे.
नागपूर : लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने संकटात सापडलेल्या परप्रांतीय कामगारांना गावाची ओढ लागली आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक परप्रांतीय कामगारांचा प्रश्न अद्याप ऐरणीवर आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात जवळपास ६६ हजार परप्रांतील कामागार आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
प्रामुख्याने बांधकाम, पॉवरलूम, हॉकर्स, दागिने घडविणारे व काखान्यातील कंत्राटी कामगारांचा यात समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने २८० निवारा केंद्रांत ६५ हजार कामगारांना आश्रय दिला. परंतु हाताला काम नसल्याने हजारो कामगार पायी वा मिळेल त्या वाहनांनी गावाकडे निघाले आहेत.
कुणी तरी आमच्या परतीच्या प्रवासासाठी पैशांची मदत करावी. आम्हाला नागपूरपर्यंत वाहन करून दिले तर पुढचा झारखंडचा प्रवास आम्ही रेल्वेने करू शकतो. - परवीनकुमार रवाने, यवतमाळ
उन्हाळ्यात शितपेयांचा व्यवसाय करण्यासाठी दोन वर्षांपासून चंद्रपुरात येत आहे. यंदा थोडा उशीर झाला. व्यवसायही सुरू करता आला नाही. आम्ही सहा व्यक्ती लोकमान्य टिळक विद्यालयातील निवारा केंद्रात राहत आहोत. - रामलाल चंपत यादव, जिल्हा कटीयार, बिहार.