निगम यांनी पदभार स्वीकारला
By Admin | Published: October 3, 2015 03:05 AM2015-10-03T03:05:39+5:302015-10-03T03:05:39+5:30
राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी बुधवारी पदभार स्वीकारला
नवे वनबल प्रमुख : सक्सेना यांना निरोप
नागपूर : राज्याचे नवे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते वनबल प्रमुख अनिलकुमार सक्सेना यांच्याकडून वन विभागाची सूत्रे हाती घेतली. यानिमित्त वन भवन येथील टकले सभागृहात सायंकाळी एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात निगम यांच्या हस्ते सेवानिवृत्त वनबल प्रमुख सक्सेना यांच्यासह सेवानिवृत्त विभागीय अधिकारी जाधव व मुख्य लेखापाल केंडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सक्सेना यांनी मनोगत व्यक्त करताना वन विभागात काम करताना जीवनात काम कसे केल्या जाते, हे मला येथील कामाने शिकविले, असे सांगितले. शिवाय वन विभागातील ३७ वर्षांच्या सेवेतून खूप काही शिकायला मिळाले, असेही ते म्हमाले.
नवनियुक्त वनबल प्रमुख ए. के. निगम यांनी अध्यक्षीय भाषणातून नवीन जबाबदारी स्वीकारताना वन विभागाचे काम यशस्वी करण्यासाठी कटिबद्घ राहील, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. एस. के. सिन्हा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंडे व प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान उपस्थित होते. संचालन शेंडे यांनी केले. राऊत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)