प्रदूषण रोखण्यासाठी मनपा व नीरी संयुक्त काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:20+5:302021-06-29T04:07:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराचे वायू प्रदूषण व अन्य प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि ...

Corporation and Neeri will work together to prevent pollution | प्रदूषण रोखण्यासाठी मनपा व नीरी संयुक्त काम करणार

प्रदूषण रोखण्यासाठी मनपा व नीरी संयुक्त काम करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराचे वायू प्रदूषण व अन्य प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) एकत्रित काम करतील, संयुक्त प्रयत्नांनी शहराला स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचा प्रयत्न करतील. असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी नीरी संस्थानाला दिलेल्या भेटीप्रसंगी व्यक्त केला.

शहराच्या वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी मनपाला नीरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहकार्य मिळत आहे. देशाच्या अनेक शहरांत वायू आणि जल प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीचा सल्ला घेतला जातो. नागपूर शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला जातो, असे महापौर म्हणाले. त्यांनी नीरीने तयार केलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली.

उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे व कार्यकारी अभियंता (पर्यावरण) श्वेता बॅनर्जी उपस्थित होते. महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी नीरी परिसरात वृक्षारोपण केले. पोहरा नदीच्या काठालगत वृक्षारोपण करण्यासाठी नीरीतर्फे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

नीरीतर्फे प्रमुख वैज्ञानिक डॉ. पदमा राव, डॉ. आत्या कपले, डॉ. रीता धापोडकर, डॉ. संगीता गोयल, डॉ. साधना रायलू, डॉ. अतुल वैद्य, डॉ. बिनीवाले व डॉ. लालसिंह तसेच मनपाचे भीमराव राऊत, संदीप लोखंडे उपस्थित होते.

...

वाहने व दहन घाटामुळे प्रदूषण

वाहनांमुळे बर्डी, धंतोली, कॉटन मार्केट, सोमलवाडा, गांधीबाग, इंदोरा, जरीपटका, महाल, घाट रोड, वर्धमाननगर, पारडी आदी भागांत प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. सर्वाधिक प्रदूषण बस, ट्रक, चारचाकी वाहन, कार, जीप अशा मोठ्या वाहनांमुळे आणि दुचाकी वाहनांमुळे होत आहे. नियंत्रणासाठी अशा वाहनांची वारंवार तपासणी व्हावी, यासोबतच बांधकाम आणि दहन घाटांमुळेसुद्धा हवेत प्रदूषण होत असल्याची माहिती नीरीच्या प्रमुख वैज्ञानिक बी. पदमा एस. राव आणि संगीता गोयल यांनी दिली.

...

विशिष्ट वृक्ष लावल्यास नियंत्रण

हवेत होणाऱ्या प्रदूषणाला रोखण्यासाठी विशिष्ट वृक्ष लावले तर याच्यावर नियंत्रण आणू शकतो, तसेच ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी करू शकतो. त्यांनी नीरीमध्ये लावण्यात आलेल्या विविध प्रकाराच्या वृक्षांची माहिती डॉ. लालसिंग यांना दिली.

Web Title: Corporation and Neeri will work together to prevent pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.