१३ खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:08+5:302021-05-08T04:08:08+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांकडून मनमानी शुल्क वसूल करणे आणि ८०-२० च्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मनपाने शहरातील १३ खासगी ...
नागपूर : कोरोना रुग्णांकडून मनमानी शुल्क वसूल करणे आणि ८०-२० च्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मनपाने शहरातील १३ खासगी रुग्णालयांना नोटीस जारी केली आहे. नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी ही नोटीस बजावली आहे.
मनपातर्फे ५ मे रोजी वोक्हार्ट रुग्णालय शंकरनगर व गांधीनगर, सेव्हन स्टार रुग्णालय जगनाडे चौक, विवेका हॉस्पिटल सुभाष नगर, सुश्रुत हॉस्पिटल रामदासपेठ, आयुष्मान हॉस्पिटल रामदासपेठ, अर्नेजा हॉस्पिटल रामदासपेठ, किंग्जवे हॉस्पिटल कस्तूरचंद पार्क, विम्स हॉस्पिटल कामठी रोड, होप हॉस्पिटल कामठी रोड, सेफ हैंड हॉस्पिटल लकड़गंज, रेडियन्स हॉस्पिटल छापरू नगर, मेडिकेयर हॉस्पिटल मानकापूर, ऑरियस हॉस्पिटल वंजारी नगर यांना नोटीस जारी करण्यात आली आहे.
खासगी रुग्णालये रुग्णांकडून मनमानी शुल्क वसूल करीत आहेत. बेड देण्याच्या नावावर अतिरिक्त शुल्क वसूल करताहेत आदी तक्रारी वााढल्या होत्या. प्रत्येक रुग्णालयात मनपातर्फे ऑडिटर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. दुसरीकडे माजी महापौर संदीप जोशी यांनीसुद्धा खासगी रुग्णालये रुग्णांची लूट करीत असल्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना लेखी तक्रार केली होती. चार दिवसात यावर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.