मनपाचे अधिकारी-कर्मचारी सायकलने कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:14+5:302020-12-03T04:19:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सकाळी सायकलने कार्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी सकाळी सायकलने कार्यालयात पोहचले. यात अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलज शर्मा, संजय निपाणे, स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस.,उपायुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, डॉ. प्रदीप दासरवार, अमोल चोरपगार, सहायक आयुक्त महेश धामेचा यांच्यासह सहायक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी आदींचा समावेश होता.
सर्व अधिकारी व कर्मचारी सकाळी ९.३० च्या सुमारास आकाशवाणी चौकात एकत्रित आले, आणि तेथून मनपा कार्यालयाला सायकलने आलेत. नागपूरात वायुप्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सायकलने कार्यालयात आल्यास प्रदूषण कमी करण्यास मदत होईल, सोबतच आरोग्यपण उत्तम ठेवता येईल, असा संदेश यातून देण्यात आला.
या मोहिमेला राष्ट्रीय नागपूर काॅपोर्रेशन एम्लाॅईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे व महासचिव रंजन नलोडे यांनी पाठिंबा जाहीर करून मनपा कर्मचाऱ्यांना आकाशवाणी चौक येथे एकत्रित होऊन कार्यालयाला
येण्याचे आवाहन केले होते. याला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला.