मनपाची ११ प्रतिष्ठानांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:28+5:302021-04-22T04:08:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी बुधवारी ११ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई ...

Corporation's action on 11 establishments | मनपाची ११ प्रतिष्ठानांवर कारवाई

मनपाची ११ प्रतिष्ठानांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी बुधवारी ११ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून ६३ हजाराचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ८२ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.

लक्ष्मीनगर झोनमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १३ हजार रुपये दंड केला. हनुमाननगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनमध्ये १८ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार, नेहरूनगरच्या पथकाने पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार. गांधीबाग झोनमध्ये चार ठिकाणी तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. आसीनगरमध्ये १२ तर लकडगंज झोनमध्ये १८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. मंगळवारी झोनमध्ये १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Corporation's action on 11 establishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.