मनपाची १८ प्रतिष्ठानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:51+5:302021-04-23T04:08:51+5:30
१.२८ लाखाचा दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी गुरुवारी १८ प्रतिष्ठाने, ...
१.२८ लाखाचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड नियमाचे उल्लंघन केल्याने मनपाच्या एनडीएस पथकांनी गुरुवारी १८ प्रतिष्ठाने, कार्यालये व दुकानांवर कारवाई करून १ लाख २८ हजाराचा दंड वसूल केला. पथकांनी दिवसभरात ७६ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली.
पथकाने मनीषनगर येथील अर्जुन मेडिकल स्टोर्स, दत्त मेडिकल स्टोर्स मनीषनगर व पुरुषोत्तम मार्केटला कर्मचाऱ्यांची चाचणी न केल्याबददल १८ हजाराचा दंड केला. लक्ष्मीनगर झोनमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड केला. धरमपेठ झोनमध्ये पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, हनुमाननगरमध्ये चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, धंतोली झोनमध्ये नऊ प्रतिष्ठानांची तपासणी करून १८ हजार रुपये दंड केला. नेहरूनगरच्या पथकाने सात प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनमध्ये चार ठिकाणी तपासणी करून १५ हजार, सतरंजीपुरा झोन पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, आसीनगरमध्ये १० प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार, लकडगंज झोनमध्ये १५ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार तर मंगळवारी झोनमध्ये १४ प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.