मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 10:58 PM2021-05-21T22:58:03+5:302021-05-21T22:59:46+5:30

Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवनची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन येथील जागेवर म.न.पा.चे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापनाकरिता ‘परिवहन भवन’ उभारण्यात येणार आहे. याकरिता १ कोटी ५० लाखांचे प्राकलन तयार करण्यात येणार आहे.

Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan: Proposal of Municipal Transport Department | मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव

मोरभवनात होणार मनपाचे परिवहन भवन : मनपा परिवहन विभागाचा प्रस्ताव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवनची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन येथील जागेवर म.न.पा.चे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापनाकरिता ‘परिवहन भवन’ उभारण्यात येणार आहे. याकरिता १ कोटी ५० लाखांचे प्राकलन तयार करण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे सन २०२१-२२ चा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर यांच्याकडे सोपविला. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. सन २०२१-२२ चा वार्षिक अर्थसंकल्प २४६.१८ कोटींचा अपेक्षित असून २४६.१५ कोटी खर्चाचा राहील. शुक्रवारी मनपा मुख्यालयातील स्व. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात स्थायी समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन समिती सदस्यांच्या वतीने परिवहन व्यहवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला. यावेळी बैठकीत समिती सदस्य संजय बालपांडे, आयशा उईके, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे आदी उपस्थित होते.

भेलावे यांनी सांगितले की, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त प्रवास करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला जलद गतीने चालना मिळण्याकरिता मनपा परिवहन विभागतर्फे, ‘शहर परिवहन सुधारणा व्यय’ अंतर्गत म.न.पा.च्या ११५ डिझेल बसेसला सी.एन.जी. किट लावण्याकरिता स्थायी समितीकडून मनपा निधीत ६ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शहराच्या सिव्हिल लाईन्स व बर्डी भागात सी.एन.जी. पंप व इलेक्ट्रिक बस चार्जिंग सेंटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परिवहन सेवा बळकटीकरणासाठी मनपाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाकडून त्यांचे निधी अंतर्गत १५ इलेक्ट्रिक बसेस शहर परिवहन सेवेकरिता परिवहन विभागाला चालविण्याकरीता मिळणार आहे. आगामी वर्षात डिजिटल पेमेंट सिस्टिम "Phone Pe" किंवा "Paytm" व्दारे प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने व तिकीट विक्रीतील चोरीला आळा घालण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट सिस्टिम प्रवाशांकरिता उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

भंगार बसेसचा वापर महिलांच्या शौचालयासाठी

”स्वच्छ भारत योजने“अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर नागपूर शहरातील प्रमुख बसथांब्यांलगत ज्या भंगार बसेस वापरात नाही अशा जुन्या बसेसच्या माध्यमातून ई-टॉयलेटची निर्मिती हा प्रकल्प कोरोना महामारी प्रादुर्भावामुळे प्रलंबित हेाता हा प्रकल्प पुन्हा सुरू करून महिलांसाठी ‘ती-बस’ "Bio Bus Toilet" तयार करण्यात येईल. या बसकरिता शहर परिवहन सुधारणा व्यय या अंतर्गत रु. ३० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

कोविड काळातील सेवेचा उल्लेख

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २३ मार्च २०२० ते २७ ऑक्टोबर २०२० पर्यंत शहर बस सेवा पूर्णत: बंद होती. मात्र या काळात शहर बसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सेवेचा विशेष उल्लेख अर्थसंकल्पीय निवेदनात करण्यात आला. प्रति बस ऑपरेटर २० ब प्रमाणे तीन ऑपरेटर मिळून ६० बसेस या कोविड १९ या महामारीत अहोरात्र सेवेत कार्यरत होत्या. या ६० बसेस आजही कोविड १९ च्या रुग्ण सेवेकरिता कार्यरत असून सर्वसामान्य नागरिकांना लाभ झालेला आहे.

४७८ बसेस कार्यान्वित केली जातील

परिवहन विभागातर्फे शहर बस प्रवाशांना आदर्श व कार्यक्षम बससेवा उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने नियोजित धोरणानुसार सन २०२१-२२ या वर्षात ६७ स्टॅन्डर्ड बस, १७० डिझेल इंधन बसचे सी.एन.जी. बसमध्ये रूपांतरित होणाऱ्या स्टॅन्डर्ड बसेस, १५० मिडी बस, ४५ मिनी बस व ०६ इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या मिडी बस तसेच केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या (सबसिडी अनुदानासह) ४० इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या बसेस अशा एकंदरीत ४७८ बसेस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

Web Title: Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan: Proposal of Municipal Transport Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.