‘श्वानदंश’ आकडेवारीत मनपाचे ‘गोलमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:11 AM2021-09-12T04:11:30+5:302021-09-12T04:11:30+5:30

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपाकडून मात्र अनेक वर्षांपासून आकडेवारीचाच खेळ ...

Corporation's 'Golmaal' in 'dog bite' statistics | ‘श्वानदंश’ आकडेवारीत मनपाचे ‘गोलमाल’

‘श्वानदंश’ आकडेवारीत मनपाचे ‘गोलमाल’

Next

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे भटक्या श्वानांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपाकडून मात्र अनेक वर्षांपासून आकडेवारीचाच खेळ करण्यात येत आहे. २०१४ ते २०१८ या चार वर्षांत नागरिकांना झालेल्या श्वानदंशांबाबत मनपाकडूनच माहिती अधिकारांमध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. तीन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत असून, हा आकडा तब्बल १९ हजारांहून अधिक आहे. त्यामुळे शहरातील नेमके किती श्वानदंश झाले व मनपाकडून जाणूनबुजून असा प्रकार करण्यात येत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘लोकमत’च्या हाती श्वानदंशासंदर्भात २०१७, २०१८ व २०२० ला मनपाने माहिती अधिकारांची प्रतच आहे. २०१७ मधील माहिती अधिकाराच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपुरातील ४३ हजार ४२२ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. २०१८ मधील माहिती अधिकारातील याच कालावधीतील आकडेवारी आश्चर्यचकित करणारी आहे. त्या आकड्यांनुसार एप्रिल २०१४ ते जुलै २०१८ या कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी २३ हजार ९२२ इतकी होती. सप्टेंबर २०१७ नंतर जुलै २०१८ पर्यंत आकडेवारी वाढणे किंवा तेवढीच राहणे अपेक्षित होते. मात्र, मनपाच्या आकडेवारीत चक्क १९ हजार ५०० इतकी तफावत आणि तीदेखील घट दाखविण्यात आली. या माहिती अधिकारानुसार २०१७-१८ शहरात ५ हजार ५३९ नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला. मात्र २०२० च्या एका माहिती अधिकाराच्या उत्तरात हीच संख्या ५ हजार ३८९ इतकी दाखविण्यात आली.

- मनपाकडून लपवाछपवी की कायद्याचे उल्लंघन ?

माहितीच्या अधिकारांतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत संपूर्ण शहरात झालेल्या श्वानदंशाबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे.

- २०१७-२०१८ च्या माहितीतील तफावत

वर्ष २०१७ मध्ये दिलेली माहिती - २०१८ मध्ये दिलेली माहिती

२०१४-१५ - १०,६४३ -३,६९९

२०१५-१६ - १२,२०७ -४,३४०

२०१६-१७ - १४,१८४ -७,०२६

२०१७-१८ - ६,३८८ (सप्टेंबरपर्यंत) -५,५३९

- २०१८-१९ मधील माहितीतील तफावत

वर्ष- २०१८ मध्ये दिलेली माहिती - २०२० मध्ये दिलेली माहिती

२०१७-१८-५,५३९ - ५३८९

Web Title: Corporation's 'Golmaal' in 'dog bite' statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.