४४८ अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:30+5:302021-02-25T04:10:30+5:30
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहरात अतिक्रमण विराेधी कारवाइचा धडाका सुरुच आहे. बुधवारी पथकांनी वेगवेगळ्या झाेनमध्ये ४४८ अतिक्रमणांवर बुलडाेजर ...
नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागातर्फे शहरात अतिक्रमण विराेधी कारवाइचा धडाका सुरुच आहे. बुधवारी पथकांनी वेगवेगळ्या झाेनमध्ये ४४८ अतिक्रमणांवर बुलडाेजर चालविले. या कारवाईत ११ ठेल्यांसह ४ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आणि ८९ हजार ५०० रुपये दंड वसुली करण्यात आली.
लक्ष्मीनगर झाेनमध्ये माटे चौक ते आयटी पार्क, गायत्री मंदिर, नागोबा मंदिर, जयताळा बाजार, खामला बाजार, देवनगर, जेरिल लॉन, आठ रास्ता चौकपर्यंत फूटपाथवरील ठेले व ४४ दुकानांचे अतिक्रमण ताेडण्यात आले. यावेळी एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. आकाशवाणी चाैक ते जीपीओ व जिल्हा कार्यालय ते व्हीसीए स्टेडियमपर्यंत २२ अतिक्रमण हटविण्यात आले व एक ट्रक सामान जप्त करण्यात आले. धरमपेठ झाेनअंतर्गत अंबाझरी राेडवरील राेपट्यांची दुकाने हटविण्यात आली. यानंतर झाशी राणी चाैक ते पंचशील चाैक, यशवंत स्टेडियमपर्यंत ४६ अतिक्रमधारकांवर कारवाई करण्यात आली. यशवंत स्टेडियम परिसरात केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करीत ४५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झाेनमध्ये बुधवारी बाजारातून राेड व फूटपाथवर लागलेले भाजीचे ठेले व दुकाने हटविण्यात आली. यादरम्यान ४२ अतिक्रमण हटवून ५ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली.
नेहरूनगर झाेनमध्ये जगनाडे चाैक ते केडीके काॅलेज, नंदनवन सिमेंट राेडपर्यंत पथकाने २० अतिक्रमण पाडले व ट्रकभर सामान जप्त केले. दिघाेरी चाैक ते रघुते भवनपर्यंत कारवाईत १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झाेनअंतर्गत अशाेक माकाेडे यांचे अनधिकृत बांधकाम ताेडण्यास गेलेल्या पथकाला अपील दाखल असल्याने परतावे लागले. यानंतर गांधीबाग उद्यानासमाेर फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. पुढे कपडा मार्केट ते नंगा पुतळादरम्यान कारवाइ करीत ४६ अतिक्रमण हटवून ३१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झाेनमध्ये दही बाजार पुल ते इतवारी रेल्वे स्टेशन, शांतिनगर पेट्राेलपंप, शांतिनगर घाटादरम्यानचे हाेर्डिंग व पाेस्टर काढण्यात आले. फूटपाथवरून अवैध ठेले हटविण्यात आले. या परिसरात ५२ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. आसीनगर झाेनमध्ये पंचशीलनगर चाैक ते वैशालीनगरपर्यंत कारवाईत ३२ अतिक्रमण हटविण्यात आले.
मंगळवारी झाेनमध्ये कारवाईदरम्यान विराेध
यापूर्वी हनुमाननगर झाेन व मंगळवारी झाेनमध्ये रात्री ११ वाजतापर्यंत अतिक्रमणविराेधी कारवाई करण्यात आली. मंगळवारी झाेनमध्ये रिलायन्स पेट्राेल पंप पाेलीस तलाव परिसरात भाजीवाल्यांची दुकाने हटविण्यात आली. यावेळी प्रचंड विराेध झाल्याने अतिरिक्त पाेलीस दल बाेलावण्यात आले. येथे ६ ठेले जप्त करण्यात आले. यानंतर मंगळवारी बाजारातून चायनीज खाद्यपदार्थांचे ५ ठेले जप्त करण्यात आले. एकूण ६८ अतिक्रमणांवर कारवाइ करीत ११ ठेले जप्त करण्यात आले व २६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झाेनमध्ये म्हाळगीनगर चाैक ते पिपळा फाटा व म्हाळगीनगर चाैक ते गजानन शाळेपर्यंत ५६ अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसुली व ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले.