बीव्हीजीच्या मनमानीवर मनपाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:55+5:302021-01-25T04:08:55+5:30

नागपूर : बीव्हीजी कंपनीने मनमानी करीत ११३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. त्यामुळे अर्ध्या शहरात तीन दिवस कचरा संकलन पूर्णपणे ठप्प ...

Corporation's silence on BVG's arbitrariness | बीव्हीजीच्या मनमानीवर मनपाचे मौन

बीव्हीजीच्या मनमानीवर मनपाचे मौन

Next

नागपूर : बीव्हीजी कंपनीने मनमानी करीत ११३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले. त्यामुळे अर्ध्या शहरात तीन दिवस कचरा संकलन पूर्णपणे ठप्प होते. एक आठवडा लोटल्यानंतरही परिस्थितीत काहीच परिणाम झाला नाही. झोन ६ ते १० दरम्यानच्या प्रभागातील वस्त्यांमध्ये कचरा संकलन वाहन वेळेवर पोहोचत नाही. पूर्व नागपुरातील अनेक परिसरातील असेच चित्र आहे. येथे नियमित गाड्या येत नाहीत. असे असतानाही मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बीव्हीजी कंपनीच्या विरोधात कुठलेही कठोर पावले उचलली नाहीत.

मनपा प्रशासन तीन दिवसांच्या संपाला सहजतेने घेत आहे. कंपनीतून काढलेत्या ११३ लोकांची माहिती व उपलब्ध सुविधांची माहिती मागितली होती. परंतु शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने कंपनीने मनपाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले नाही. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काढले आहे, त्यांना परत कामावर ठेवण्यास कंपनीची मानसिकता नाही. त्यामुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बाजारातही कचरा संकलन वाहन दिसून येत नाही.

- दंडाबाबत निर्णय नाही

आंदोलनाच्या आठवड्याभरानंतरही बीव्हीजी कंपनीवर मनपाने दंडासंदर्भात निर्णय घेतला नाही. जेव्हा की ३ दिवस पूर्णपणे काम ठप्प झाले होते. त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे होते. प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईसाठी उत्सुकता दिसून येत नाही.

- शहराची प्रतिष्ठा झाली कमजोर

कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एजी यरो व बीव्हीजी कंपनीला अर्धे अर्धे शहर वाटून दिले आहे. त्यामुळे कचरा संकलन व्यवस्था उत्तम होईल अशी अपेक्षा होती. पण १३ महिन्यांच्या अल्प कालावधीत स्वच्छतेच्या बाबतीत दोन्ही कंपन्यांनी शहराच्या प्रतिष्ठेला बट्टा लावला आहे. एजी एन्व्हायरो तर १५० रुपये प्रतिटन जास्त घेत आहे. त्यांचे कचरा संकलनाचे काम तेवढेच निकृष्ठ दर्जाचे आहे.

Web Title: Corporation's silence on BVG's arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.