मनपाचे लवकरच क्रीडा धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:11 AM2021-08-24T04:11:18+5:302021-08-24T04:11:18+5:30
क्रीडा समितीची मंजुरी : अंतिम मंजुरीवर होणार सभागृहात चर्चा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील क्रीडा वातावरणाला चालना ...
क्रीडा समितीची मंजुरी : अंतिम मंजुरीवर होणार सभागृहात चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील क्रीडा वातावरणाला चालना मिळावी, नागपूर शहरातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर नावलौकिक मिळवावा, या उद्देशाने मनपा क्रीडा धोरण राबविणार आहे. क्रीडा विशेष समितीने सोमवारी याला मंजुरी दिली. लवकरच सभागृहात अंतिम मंजुरीसाठी ठेवणार आाहे.
मनपा मुख्यालयातील सभागृहात क्रीडा विशेष समितीची बैठक घेण्यात आली. सभापती प्रमोद तभाने, उपसभापती लखन येरवार, सदस्य शेषराव गोतमारे, हरीश ग्वालबन्शी, सदस्या जिशान मुमताज मो. इरफान अन्सारी, उपायुक्त विजय देशमुख, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.
क्रीडा धोरणात आवश्यक बदल करण्याचे सर्व अधिकार महापौर आणि मनपा आयुक्तांना राहतील, अशी माहिती प्रमोद तभाने यांनी दिली. क्रीडा धोरणामध्ये कुस्ती या खेळासंबंधी सुविधेसंदर्भात प्रावधान अंतर्भूत करण्याची सूचना यावेळी समितीचे सदस्य हरीश ग्वालबन्शी यांनी केली.
सहा विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी एक मैदान विकसित करण्यात येत आहे. यापैकी मरारटोली, प्रेमनगर, जुनी बस्ती, बापूनगर आणि महावीरनगर या पाच मैदानांची पाहणी करण्यात आली.
यशवंत स्टेडियम येथे नियमित स्वच्छता होत नसल्याबाबत अनेक तक्रारी आहेत. यासंदर्भात विभागाद्वारे त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
...
क्रीडा कार्यावर लघुपट
मनपाने आजवर क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मागील ५० वर्षांत केलेल्या कार्यावर लघुपट तयार करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रशासनाद्वारे कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत दिले.