गडरलाईनच्या कामासाठी नगरसेवक बसले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:09 PM2019-07-09T22:09:15+5:302019-07-09T22:10:23+5:30
अयोध्यानगर मेन रोडवरील गडरच्या चेंबरमधून गेल्या १० दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. गडराच्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारीही केल्या होत्या. नगरसेवकांनी स्वत: घटनास्थळाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. तातडीने काम सुरू करून नवीन लाईन टाकण्याचे व चेंबर बनविण्याचे काम मंजूरही करण्यात आले. पण कामाला काही सुरुवात झाली नाही. रस्त्यावरून घाण पाणी वाहने सातत्याने सुरूच होते. त्यामुळे स्थानिक भाजपाचे नेते परशु ठाकूर, नगरसेविका रुपाली ठाकूर, स्नेहल बिहारे यांनी घटनास्थळावरच रस्ता रोको केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्यानगर मेन रोडवरील गडरच्या चेंबरमधून गेल्या १० दिवसांपासून घाण पाणी वाहत आहे. गडराच्या घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यासंदर्भात नागरिकांनी नगरसेवकांना तक्रारीही केल्या होत्या. नगरसेवकांनी स्वत: घटनास्थळाला भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले होते. तातडीने काम सुरू करून नवीन लाईन टाकण्याचे व चेंबर बनविण्याचे काम मंजूरही करण्यात आले. पण कामाला काही सुरुवात झाली नाही. रस्त्यावरून घाण पाणी वाहने सातत्याने सुरूच होते. त्यामुळे स्थानिक भाजपाचे नेते परशु ठाकूर, नगरसेविका रुपाली ठाकूर, स्नेहल बिहारे यांनी घटनास्थळावरच रस्ता रोको केला. जोपर्यंत काम सुरू होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा परशु ठाकूर यांनी दिला. त्यामुळे दोन तासांनी हनुमाननगर झोनचे सहा. आयुक्त भिवगडे आणि उपअभियंता हेडाऊ हे आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी आंदोलकांना लगेच काम करण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.