मराठी विश्वकोषातील महात्मा गांधींबद्दलचे शब्दप्रयोग दुरुस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:55+5:302021-04-08T04:09:55+5:30
- विकास ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठी विश्वकोषात महात्मा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करताना नथुराम ...
- विकास ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठी विश्वकोषात महात्मा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य करताना नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. हे शब्दप्रयोग दुरुस्त करण्याच्या मागणीचे पत्र आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मराठी विश्वकोष निर्मिती मंडळातर्फे निर्मिलेल्या मराठी विश्वकोष खंड १४ मधील पान क्रमांक ६७६ व ९४३वर महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेबद्दल उदात्तीकरणाचा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जात असून, त्यात दुरुस्ती करावी. पृष्ठ क्रमांक ६७६वरील ‘महात्मा गांधीच्या वधानंतर’ यातून ‘वधानंतर’ हा शब्द गाळावा आणि त्याऐवजी ‘खुनानंतर’ असा शब्दप्रयोग करावा. तसेच पृष्ठ क्रमांक ९४३वरील ‘गांधीच्या वधाने’ यातून ‘वधाने’ हा शब्दप्रयोग गाळून त्याऐवजी ‘खुनाने’ तर ‘गांधी वधाबद्दल’ याऐवजी ‘गांधींच्या खुनाबद्दल’ असा शब्दप्रयोग योजावा. ‘नथुराम गोडसे हे संघात होते’ यातून ‘होते’ हा शब्द गाळून त्याऐवजी ‘होता’ असा शब्द योजावा. यापुढे सर्व शासकीय दस्तऐवजांत व नोंदीत ‘गांधीवध’ याऐवजी ‘गांधीजींचा खून’ असा शब्दप्रयोग करावा. खुनी वा हत्या करणाऱ्याचे उदात्तीकरण टाळण्यासाठी नथुराम गोडसेचा खुनी वा हत्यारा म्हणूनच सरकारी दस्तऐवजात उल्लेख करावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली आहे. याकरिता प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार व इतरांचे निवेदन अवलोकनार्थ संलग्न करण्यात आले आहे.
......................