फळ व भाजीपाल्याच्या सुरक्षित पॅकेजिंगसाठी ‘कोरुगेटेड बॉक्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:39 PM2019-01-18T23:39:25+5:302019-01-18T23:40:34+5:30
आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आता उपलब्ध झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आता उपलब्ध झाले आहेत.
वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्टॉलवर या बॉक्सेसचे वैशिष्ट्य पाहून शेतकरीही आश्चर्यचकित झाले. कोरुगेटेड बॉक्स हे वजनाने हलके व अतिशय टिकाऊ आहेत. प्रत्येक प्रकारचे फळ आणि भाजीपाल्यासाठी सुरक्षित आहेत. इतकेच नव्हे तर या बॉक्सवर कुणी उभे झाले तरी त्याला धक्का सुद्धा लागत नाही, इतके ते सुरक्षित आहेत.
विजय दर्डा यांनी दिली भेट
लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी या स्टॉलला आवर्जून भेट दिली. वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष के. अरुणाचलम यांनी दर्डा यांचे स्वागत केले. या कोरुगेटेड बॉक्सचे वैशिष्ट्य ऐकून विजय दर्डा अतिशय प्रभावित झाले.
यावेळी वनराईचे गिरीश गांधी, तसेच कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे कीर्ती गांधी, आर.के. पांडे, विनोद ठाकरे, हरेश मेहता, संबित कानुनगो, योगेंद्रकुमार यादव, अशोक बलानी, संजय अग्रवाल, दिनू शेट्टी, मनंग देसाई, संजय अहीरे, अनिल लोया आदी उपस्थित होते.
कोरुगेडेट बॉक्सच्या डस्टबीननेही वेधले लक्ष
स्वच्छ भरत मिशन अंतर्गत वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने कोरुगेडेट बॉक्सचे तयार केलेले डस्टबीन खास फेस्टिव्हलसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे डस्टबीनही शेतकरी व येथे येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.