सावनेर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:58 PM2020-06-12T23:58:29+5:302020-06-13T00:01:13+5:30

कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली.

Corrupt Sub-Inspector of Police arrested at Savner Police Station | सावनेर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक अटकेत

सावनेर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षक अटकेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सावनेर परिसरात करण्यात आली.
निशांत परमानंद जुनोनकर (४०) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्त्याने सावनेर शहरात विदेशी दारूची खरेदी केली. ती दारू त्याला कळमेश्वरला न्यायची होती. ती नेण्यासाठी कुठलीही कारवाई केली जाणार नाही, असे सांगत निशांत जुनोनकर यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारकर्त्याने यासंदर्भात एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने त्यांनी सापळा रचला आणि निशांत जुनोनकर व सागर नंदकिशोर गजरे (२३) या दोघांना रंगेहात अटक केली.

Web Title: Corrupt Sub-Inspector of Police arrested at Savner Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.