नागपूर महापालिकेत कागद खरेदीत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:23 PM2018-11-17T23:23:21+5:302018-11-17T23:24:32+5:30

महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स्थायी समितीने यास मंजुरी दिली. मात्र, आतापर्यंत जन्म-मृत्यू विभागातर्फे नियमित पुरवठादाराकडून ७.९५ रुपये दराने कागद खरेदी केला जात होता. याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Corruption to buy paper in Nagpur Municipal Corporation | नागपूर महापालिकेत कागद खरेदीत भ्रष्टाचार

नागपूर महापालिकेत कागद खरेदीत भ्रष्टाचार

Next
ठळक मुद्देजन्म-मृत्यू विभागातील प्रकार : स्थायी समिती अध्यक्षांनी केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेत जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी कागद खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी निविदा मागितल्याने हा प्र्रकार समोर आला हे विशेष. निविदा बोलावल्यानंतर प्रमाणपत्रासाठी योग्य कागदाचा दर ४.७५ रुपये पुढे आला असून, स्थायी समितीने यास मंजुरी दिली. मात्र, आतापर्यंत जन्म-मृत्यू विभागातर्फे नियमित पुरवठादाराकडून ७.९५ रुपये दराने कागद खरेदी केला जात होता. याप्रकरणी स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
मनपा स्थायी समितीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत जन्म-मृत्यू विभागाने प्रमाणपत्रांसाठीच्या कागदासाठी बोलावण्यात आलेल्या निविदेपैकी गुरुकृपा प्रिंटर्स अ‍ॅन्ड स्टेशनर्स यांची ४.७५ रुपये प्रतिकागद दराची निविदा मंजूर करण्यात आली. मात्र, यापूर्वी विभागाकडून नियमित पुरवठादार एजन्सीकडून हाच कागद ७.९५ रुपये दराने खरेदी केला जात होता, असे कुकरेजा यांनी नमूद केले. निविदेतील दर आणि आतापर्यंत देण्यात येणाऱ्या दरात ३.२० रुपयांची तफावत बघता कागद खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी वर्षाला ४० हजार कागदांची गरज असते. त्यामुळे यात वर्षाला जवळपास १ लाख २८ हजारांचा भ्रष्टाचार दिसून येत आहे. कुकरेजा यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मात्र, त्यांच्यावर कारवाई टाळली.

अमृत योजनेंच्या कामासाठी कार्यादेश
स्थायी समितीच्या बैठकीत अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २७३ कोटींच्या कामाचे सहा भाग करण्यात आले होते. त्यापैकी तीन भागाच्या निविदा उघडण्याचे तसेच २५ तारखेपर्यंत दर निश्चित करून कार्यादेश देण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे कुकरेजा यांनी नमूद केले. यातून ४४ जलकुंभ तसेच ४३.४८ कोटी खर्चाची मुख्य जलवाहिनी व ७१ कोटींचे वस्त्यांतील जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे.

जलकुंभ सुरू करण्याचे निर्देश
नासुप्रने नारा, वांजरा, कळमना व चिचभवन येथे जलकुंभ बांधले. यापैकी नारा, चिचभवन व वांजरा येथील जलकुंभ ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले. याशिवाय एलईडी लाईट्स प्रकरण न्यायालयातून मोकळे झाले असून, आता पुन्हा हे लाईट्स लावण्याचे काम सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आल्याचे ते म्हणाले.

Web Title: Corruption to buy paper in Nagpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.