‘ऑड-इव्हन’ पद्धतीने भ्रष्टाचार वाढला : कैलास जोगानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:37 AM2020-08-09T00:37:41+5:302020-08-09T00:39:01+5:30

मनपाने सुरू केलेल्या ‘ऑड-इव्हन’ पद्धतीत इन्स्पेक्टर राज वाढले असून मनपा निरीक्षक लहान दुकानदारांकडून ५ हजार रुपयाचा दंड वसूल करीत आहे. या दंडाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दंडाच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलास जोगानी यांनी लोकमतशी बोलताना केला.

Corruption on the rise in 'odd-even' method: Kailash Jogani | ‘ऑड-इव्हन’ पद्धतीने भ्रष्टाचार वाढला : कैलास जोगानी

‘ऑड-इव्हन’ पद्धतीने भ्रष्टाचार वाढला : कैलास जोगानी

Next
ठळक मुद्देमनपा वसूल करताहेत लहान दुकानदारांकडून ५ हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाने सुरू केलेल्या ‘ऑड-इव्हन’ पद्धतीत इन्स्पेक्टर राज वाढले असून मनपा निरीक्षक लहान दुकानदारांकडून ५ हजार रुपयाचा दंड वसूल करीत आहे. या दंडाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दंडाच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष कैलास जोगानी यांनी लोकमतशी बोलताना केला.
भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मुंबईप्रमाणेच वेळ कमी करून आठवड्यात सर्व दिवस दुकाने सुरू ठेवण्याची मागणी जोगानी यांनी केली आहे. ते म्हणाले, मनपा निरीक्षक डेली निड्स, पेपर आणि छोटे जनरल स्टोअर्सकडून किमान ५ हजार रुपयांचा दंड वसूल करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात साडेतीन महिने दुकाने बंद राहिल्याने लहान दुकानदारांना आर्थिक नुकसान झाले आहेत. ५ जूनपासून दुकाने सुरू झाली. फारसे ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांना थोडेफार उत्पन्न मिळत आहे. पण ऑड-इव्हन पद्धतीविरुद्ध दुकान सुरू राहिल्यास उत्पन्न नसतानाही भरमसाट दंड वसूल करण्यात येत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दंड कुठून भरावा, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे. मनपाच्या हुकूमशाहीमुळे छोट्या आणि मध्यम दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे.
जोगानी म्हणाले, लॉकडाऊन आणि ऑड-इव्हन पद्धतीनंतरही नागपूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एखादा व्यापारी कोरोना रुग्ण निघाल्यास त्याचे दुकान २८ दिवस बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळै त्यांना सर्वाधिक आर्थिक नुकसान सोसाचे लागत आहे. सर्व उपायानंतरही मनपा प्रशासन कोरोनावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरले आहे. अशा स्थितीत मुंबई आणि अन्य राज्यातील अनेक महानगरांप्रमाणेच ऑड-इव्हन पद्धत बंद करून नियमित वा आठवड्यातून पाच दिवस दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. व्यापारी सोशल डिस्टिन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत आहे. शिवाय दुकानात येणाऱ्या ग्राहकाना मास्क पुरवून त्यांची काळजी घेत आहेत. असे असतानाही ऑड-इव्हन पद्धत का, असा सवाल जोगानी यांनी केला.
जुलैच्या अखेरीस मनपा प्रशासनाने शनिवार व रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे ग्राहकांची खरेदी थांबली. जनता कर्फ्यूमुळे मनपा ऑनलाईन व्यवसायाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप जोगानी यांनी केला. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात ऑड-इव्हन पद्धत बंद केली आहे. ही पद्धत नागपुरात किती दिवस सुरू राहील, याची गॅरंटी नसल्याने नागपूरचा व्यापार दुसऱ्या शहरांमध्ये जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Corruption on the rise in 'odd-even' method: Kailash Jogani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.