मंडपाचा खर्च पाचपट

By Admin | Published: August 18, 2015 03:15 AM2015-08-18T03:15:43+5:302015-08-18T03:15:43+5:30

सार्वजनिक जागेवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सव वा अन्य धार्मिक कार्यक्र मासाठी मंडप, स्टेज अथवा गेट उभारावयाचे

The cost of the camp is five times | मंडपाचा खर्च पाचपट

मंडपाचा खर्च पाचपट

googlenewsNext

नागपूर : सार्वजनिक जागेवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सव वा अन्य धार्मिक कार्यक्र मासाठी मंडप, स्टेज अथवा गेट उभारावयाचे असेल तर सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना आता हात सैल करावा लागणार आहे. मंडप वा गेट उभारण्यासाठी नवीन धोरणानुसार पाच पटीने अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दिशा निर्देशानुसार शहरातील सार्वजनिक जागेवर, रस्त्यावर वा फुटपाथवर गणेशोत्सव, दुर्गा उत्सवप्रसंगी अस्थायी स्वरुपाचे मंडप वा स्वागतद्वार इत्यादी उभारण्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत परवानगी देण्यासंदर्भातील मनपाच्या सुधारित धोरणाला सदस्यांच्या सूचनासह सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आल्याची घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी केली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
मनपाकडून दोन रुपये प्रतिफूट दराने शुल्क आकारले जात होते. आता ही रक्कम प्रति चौरस फूट १० रुपये करण्यात आली असून सुरक्षा ठेवीच्या रकमेत मोठी वाढ करून पाच हजार करण्यात आली आहे. तसेच अनुमती अर्जासोबत पोलीस वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस, पोलीस आयुक्त आदींच्या अनुमतीचे पत्र सादर करावे लागेल. तसेच मंडपाचा नकाशा जोडावा लागणार आहे. अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, स्ट्रक्चर स्टेबिलिटी प्रमाणपत्र यासह १०० रुपयाच्या स्टॅम्पवर अर्ज करावा लागेल. जाचक अटींची पूर्तता केल्यानंतर मनपाच्या अधिनियमानुसार १५ दिवसासाठी अनुमती दिली जाणार आहे. रहदारीचा रस्ता, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आॅटोरिक्षा स्टँड, टॅक्सी स्टँड, रुग्णालय व शैक्षणिक संस्था आदींच्या ३० मीटर परिसरात मंडप, गेट वा स्टेज उभारण्याला अनुमती दिली जाणार नाही. मनपा व पोलीस विभागासोबतच पर्यावरण, न्यायालय आदींच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, सार्वजनिक मंडळांना करावे लागणार आहे.(प्रतिनिधी)

अनेक परवानग्यांची गरज
४मंडपासाठी अनुमती घेताना विविध विभागांच्या परवानग्या घ्याव्या लागतील. दुसरीक डे अस्थायी मंडप व स्वागतद्वार उभारण्यासाठी अनुमती घेतल्यास मनपा नोटीस न बजावता तात्काळ हटविले जाईल. मंडप व स्वागतद्वार उभारण्यासाठी उत्सवाच्या ३० दिवसापूर्वी झोन कार्यालयाकडे अनुमती अर्ज करावा लागेल. अर्जासोबत पोलीस वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस, पोलीस आयुक्त आदींच्या अनुमतीचे पत्र सादर करावे लागेल. तसेच मंडपाचा नकाशा जोडावा लागणार आहे. तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, स्ट्रक्चर स्टेब्लिटी प्रमाणपत्र यासह १०० रुपयांच्या स्टॅम्पवर अर्ज करावा लागेल.

तर तासाला १०० रुपये दंड
४मंडप वा गेट उभारण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर मंडप वा गेट काढले नाही तर मंडळांना दर तासाला १०० रुपये दंड द्यावा लागणार आहे. २४ तासापर्यंत दंड आकारला जाईल. त्यानतंरही मंडप हटविला नाही तर संबंधिताच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मंडळावर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल.

चित्रलेखा भोसले यांना श्रद्धांजली
४माजी खासदार चित्रलेखा भोसले यांना सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानिमित्त सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा प्रस्ताव विरोधीपक्षनेते विकास ठाकरे यांनी मांडला. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी याला अनुमोदन दिले. सभागृहाचे कामकाज तहकूब करून २१ आॅगस्टला सभा घेण्यात येईल अशी घोषणा दटके यांनी केली.

Web Title: The cost of the camp is five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.