कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ

By सुनील चरपे | Published: March 25, 2023 08:00 AM2023-03-25T08:00:00+5:302023-03-25T17:21:56+5:30

Nagpur News सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादकांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

Cost of cotton seeds will break farmers' backs; BG-2 seed price hiked by Rs.43 | कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ

कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ

googlenewsNext

सुनील चरपे 

नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग तिसऱ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाणे दरांत वाढ केली आहे. यावर्षी प्रतिपाकीट (४५० ग्राम) ४३ रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी ८६ रुपये, तर अतिघन लागवडीसाठी २५६ रुपये अतिरिक्त माेजावे लागणार आहेत. सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादकांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात सन २००३ पासून कपाशीच्या बीजी-२ बियाण्यांचा वापर केला जात असून, एचटीबीटी वाणाच्या चाचण्या आणि वापरावर बंदी घातली आहे. बीजी-२ बियाणे कालबाह्य झाल्याने या बियाण्यांच्या उत्पादनाला राॅयल्टी द्यावी लागत नाही. एकदा तयार झालेले बियाणे ३ ते ४ वर्षे चालते. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपनीला केवळ साठवणूक व वाहतुकीचा खर्च करावा लागताे.

अलीकडे कापसाचे उत्पादन सातत्याने घटत असल्याने केंद्र सरकारने काही अटींवर एचटीबीटी वाणाच्या चाचण्यांना परवानगी दिल्याने २ ते ३ वर्षांत नवीन बियाणे बाजारात येईल. बीजी-२ बियाणे कमी दरात विकून त्याचा साठा कमी करणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आधी कंपन्यांनी राॅयल्टीच्या नावावर शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतले; तर आता केंद्र सरकार पैसे वसूल करीत आहे, असा आराेप शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला.

शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड

देशात दरवर्षी सरासरी ११० लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी केली जाते. यासाठी ६० ते ६५ टक्के बीजी-२ आणि ३५ ते ४० टक्के बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे वापरले जाते. कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी दाेन (९०० ग्राम), तर अतिघन लागवडीसाठी सहा पाकिटे (२ किलाे ७०० ग्राम) बियाण्यांची आवश्यकता असते. केंद्र सरकार कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी अतिघन लागवड कपाशीला प्राधान्य देत असून, दुसरीकडे बियाण्यांचे दर वाढवून शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड लादला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे दर कमी झाले आहेत. बियाण्यांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे देशातील कापसाचा पेरा कमी हाेण्याची शक्यता बळावली आहे.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक

कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र

 

गुलाबी बाेंडअळीची बीजी-२ बियाण्यांतील जनुके प्रतिकारशक्ती वाढल्याने सध्याचे बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. केंद्र सरकारने ‘अपग्रेडेट’ बियाणे उपलब्ध करून दिल्यास ते शेतकरी अधिक दर देऊन खरेदी करतील.

- दिलीप ठाकरे, सदस्य,

पीएसी (सेबी) तथा ॲग्राेस्टार हातरून

...

Web Title: Cost of cotton seeds will break farmers' backs; BG-2 seed price hiked by Rs.43

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.