देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:48 PM2019-10-10T22:48:09+5:302019-10-10T22:50:15+5:30

आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

 Cotton growers farmers in country to be in crises: Prakash Ambedkar | देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत येणार : प्रकाश आंबेडकर

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ला सुरुवात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : देशात सत्ताधाऱ्यांकडून कलम ३७० चे तुणतुणे वाजविण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे अमेरिकेकडूनदेखील सांगण्यात आले आहे. या मुद्द्यावर आता आंतरराष्ट्रीय ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू झाले आहे. आता देशात अमेरिकेतील कापूस आयात करण्यात येईल व त्याचा फटका देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
नागपुरात दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील सुभाषनगर भागात आयोजित प्रचारसभेदरम्यान ते बोलत होते. मागील काही काळापासून देशात आर्थिक स्थैर्य नाही. ५०० कोटींहून जास्त संपत्ती असलेल्या ३३ हजार कुटुंबीयांनी देश सोडला. बँकादेखील सुखरुप नाहीत. बँकांमधील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर विरोधी पक्ष मजबूत हवा. परंतु मतदारांनी विरोधी पक्ष कमकुवत केला, असेदेखील ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरची स्थितीत अद्यापही सुधारलेली नाही. काश्मीर नवा ‘पॅलेस्टाईन’ म्हणून समोर येत आहे. धर्मवेड्या भूमिकेमुळे देशाचा बळी दिल्या जात आहे. जर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा विरोधी पक्ष नसेल तर देशात नवा हिटलर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, असेदेखील आंबेडकर म्हणाले.

Web Title:  Cotton growers farmers in country to be in crises: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.