‘गॅस्ट्रोकॉन’वर १० पासून परिषद

By admin | Published: January 8, 2015 01:20 AM2015-01-08T01:20:08+5:302015-01-08T01:20:08+5:30

मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन १० जानेवारीपासून रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये होणार आहे.

Council on GastroCon from 10 | ‘गॅस्ट्रोकॉन’वर १० पासून परिषद

‘गॅस्ट्रोकॉन’वर १० पासून परिषद

Next

मिडासचे आयोजन : देश-विदेशातील डॉक्टर्स हजर राहणार
नागपूर : मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’वर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन १० जानेवारीपासून रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये होणार आहे.
इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी सांगितले की, पोट, आतडे आणि यकृत यांच्याशी संबंधित विकारावर परिषदेत चर्चा होणार आहे. सकाळी आणि दुपार असे दोन सत्र राहील. सकाळचे सत्र सकाळी १० वाजता आणि दुपारचे सत्र दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे. परिषदेत संवादात्मक सत्र, गटचर्चा, केसवर आधारित तसेच विभिन्न विकारांवर चर्चा होणार आहे.
विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टरांनी परिषदेसाठी नोंदणी केली आहे. आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह ६० फॅकल्टी सदस्य उपस्थित राहतील. यामध्ये इंग्लंडचे डॉ. जे.बी. दिलावरी, अमेरिकेतील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा तसेच पीजीआय चंदीगडचे संचालक डॉ. योगेश चावला. आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी, बलवेव इन्स्टिट्यूट आॅफ डायजेस्टिव्ह सायन्सेसचे मुख्य एन्डोस्कोपिस्ट डॉ. अमित मेदेव, मेदांता इन्स्टिट्यूट, नवी दिल्लीचे गॅस्ट्रोएन्टरोलॉजीचे संचालक डॉ. रणधीर सूद प्रामुख्याने उपस्थित राहतील. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने वर्षातून दोनदा अशा परिषदेचे आयोजन करण्यात येते.
पत्रपरिषदेत डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Council on GastroCon from 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.