मनपात १२ वीं उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:25+5:302021-07-12T04:07:25+5:30

लोकमत न्यूज नागपूर : सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयातील महापौर सभा कक्षात आज सोमवार पासून १२ वी पास ...

Counseling center for 12th pass students in Manpat | मनपात १२ वीं उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र

मनपात १२ वीं उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र

googlenewsNext

लोकमत न्यूज

नागपूर : सिव्हील लाईन येथील महापालिका मुख्यालयातील महापौर सभा कक्षात आज सोमवार पासून १२ वी पास विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची माहिती देण्यासाठी समुपदेशन केन्द्र सुरू करण्यात येत आहे.

महापौरांनी मनपा प्रशासनाला विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिले होते. बारावी पास विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणाकरिता ज्या स्पर्धात्मक ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्याच्या अनेक फेरीनंतर पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चीत होतो. परंतु गरीब विद्याथ्यार्ंकडे सुविधा उपलब्ध नाही. त्यांचे वर्ष वाया जाते. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी ऑनलाईन परीक्षा निकालाच्या आधारावर मेरिट यादीप्रमाणे प्रवेश निश्चित करण्यात येते. अशा सर्व स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्या मुलांना मिळालेल्या गुणानुसार कुठला पसंतीक्रम द्यायचा आणि प्रवेश प्राप्त करीत असताना वेगवेगळ्या फे-यामधून कसे जायचे याबाबत सविस्तर माहिती समुपदेशनादरम्यान दिली जाणार आहे.

या समुपदेशन केंद्रात तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाने घेतलेली आहे. ही सर्व सुविधा दिली जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Web Title: Counseling center for 12th pass students in Manpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.