९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 09:44 PM2019-02-20T21:44:25+5:302019-02-20T21:45:39+5:30

तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. नियमाक मंडळाच्या अध्यक्षासह सदस्य नागपुरात पोहचले आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नाट्यकर्मींची वर्दळ वाढली आहे.

'Count Down' of 99th Natya Sammelan: 1000 representatives from across the state | ९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी

९९ व्या नाट्य संमेलनाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू : राज्यभरातून येणार १००० प्रतिनिधी

googlenewsNext
ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या कार्यालयात वाढली धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तब्बल ३५ वर्षानंतर नागपुरात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी २० समित्या गठित करण्यात आल्या आहे. नियमाक मंडळाच्या अध्यक्षासह सदस्य नागपुरात पोहचले आहे. त्यामुळे नाट्य परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी, नाट्यकर्मींची वर्दळ वाढली आहे.
नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगावर गुरुवारी सायंकाळी अशोक हांडे यांचा मंगलगाणी दंगलगाणी हा मराठमोळ्या संगीताचा कार्यक्रम होणार आहे. महापौर करंडकच्या माध्यमातून नाट्य संमेलनाचा एक माहौल तयार झाला आहे. शहरात महत्त्वाच्या चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी नाट्य संमेलनाचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आले आहे. शहरातील सर्व नाट्य संस्था, शिक्षण संस्था यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या नाट्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १ हजारावर प्रतिनिधी येणार आहे. नाट्य संमेलनासाठी खास रेल्वेची बोगी आरक्षित करण्यात आली आहे. त्यात मुंबईहून ११० कलावंत येणार आहे. ७० कलावंत विमानाने नागपुरात येणार आहे. नाट्य कलावंत व प्रतिनिधींची निवास व भोजन व्यवस्था शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रत्येक समितीत १ अध्यक्ष व १५ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना आपापली जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 ग्रंथदिंडीने होणार सुरुवात
नाट्य संमेलनाच्या परिसराला राम गणेश गडकरी नाट्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. तर मुख्य रंगमंचाला पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच नाव देण्यात आले आहे. २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन होणार असून, त्यापूर्वी ३ वाजता नाट्यदिंडी निघणार आहे.
 सलग ६० तास चालणार संमेलन
२२ फेब्रुवारीला सायंकाळी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच संमेलनातील कार्यक्रमाला सुरुवात होणार असून २५ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत नाट्यनगरीत सलग कार्यक्रम रंगणार आहेत. म्हणजेच दिवसरात्र कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
 नागपूरकर व नाट्यकर्मींसाठी पर्वणी
३५ वर्षानंतर हे नाट्य संमेलन नागपुरात होत आहे, हेच मुळी आकर्षण आहे. या संमेलनासाठी जे वातावरण तयार झाले आहे, त्यातून स्थानिक रंगकर्मींसाठी चांगली संधी आहे. नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत एकांकिका, नाटक, परिसंवाद, खडा तमाशा आदी कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाला केवळ दीड महिन्याचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही कमी जास्त झाले असले तरी, हा संमेलनाचा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या सर्व शाखा प्रयत्नरत आहे.
शेखर बेंद्रे, कार्यकारिणी सदस्य, नाट्य परिषद, मुंबई

 

Web Title: 'Count Down' of 99th Natya Sammelan: 1000 representatives from across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.