बनावट देशी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:51+5:302021-07-07T04:10:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. रामटेक) येथील मिलन चाैकात केलेल्या कारवाईमध्ये विना परवाना ...

Counterfeit native pistol, live cartridge seized | बनावट देशी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

बनावट देशी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापरखेडा (ता. रामटेक) येथील मिलन चाैकात केलेल्या कारवाईमध्ये विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्यास ताब्यात घेत अटक केली आणि त्याच्याकडून पिस्टल व तीन जिवंत काडतूस जप्त केली. पिस्टल देशी बनावटी (हॅण्डमेड) असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचेे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कारवाई मंगळवारी (दि. ६) सायंकाळी करण्यात आली.

विजय कुमार ऊर्फ रामफल मदनप्रसाद (३६, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापरखेडा परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना खापरखेडा येथील मिलन चाैकात फिरत असलेल्या एका व्यक्तीकडे अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या चाैकाची पाहणी करीत संशयाच्या बळावर विजय कुमारला शिताफीने ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान त्याच्या कंबरलेला उजव्या भागाला पिस्टल लटकविलेले तसेच त्यात तीन जिवंत काडतूस असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याच्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याने पाेलिसांनी त्याला अटक करून पिस्टल व काडतूस जप्त केले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, सहायक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, साहेबराव बहाळे, वीरेंद्र नरड, विनोद काळे, शैलेश यादव, अरविंद भगत, सत्यशील कोठारे, प्रणयसिंग बनाफर यांच्या पथकाने केली.

....

गाेरखपूर कनेक्शन

आराेपी विजय कुमार हा मूळचा गाेरखपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, २० वर्षांपासून सिल्लेवाडा येथे राहताे. त्याने हे पिस्टल व काडतूस डिसेंबर-२०२० मध्ये गाेरखपूर येथून २५ हजार रुपयांमध्ये खरेदी केले हाेते. तेव्हापासून आजवर सतत पिस्टल बाळगत हाेता. ते पिस्टल देशी बनावटीचे असून, लाेडेड हाेते, अशी माहिती सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत यांनी दिली. या भागात आणखी काही जणांकडे अग्निशस्त्र असून, ती उत्तर प्रदेश व बिहारमधून आणलेली आहेत.

060721\img-20210706-wa0023.jpg~060721\1935-img-20210706-wa0024.jpg

आरोपीस ताब्यात घेऊन कारवाही करणारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक~जप्त करण्यात आलेले बनावटी माऊझर आणि काडतुसे

Web Title: Counterfeit native pistol, live cartridge seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.