अमेरिका, चीनसारख्या देशांकडून इतरांना स्वार्थातूनच मदत : मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 08:30 AM2022-09-30T08:30:54+5:302022-09-30T08:31:23+5:30

संकटात असताना मदतीला धावून जाणे फक्त भारताचा स्वभाव, सरसंघचालकांचं वक्तव्य.

Countries like America and China help others out of selfishness rss chief Mohan Bhagwat | अमेरिका, चीनसारख्या देशांकडून इतरांना स्वार्थातूनच मदत : मोहन भागवत

अमेरिका, चीनसारख्या देशांकडून इतरांना स्वार्थातूनच मदत : मोहन भागवत

googlenewsNext

नागपूर : श्रीलंकेत जोपर्यंत व्यापार होता तोपर्यंत चीन, अमेरिका, पाकिस्तान तेथे जात होते. मात्र श्रीलंकेतील संकट, मालदीवमधील पाणीटंचाई यासह विविध देशांच्या मदतीला भारत सहजपणे धावून गेला. अमेरिका, चीनसारख्या बहुतांश देशांकडून स्वार्थातूनच इतरांना मदत होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्रातर्फे आयोजित चिंतन बैठकीच्या समारोप कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते. 

रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल, उमरावसिंह ओस्तवाल, विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्रसिंह संधू, चंद्रशेखर घुशे, श्याम शर्मा, सुधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.  

विश्वची माझे घर या भावनेने भारतीय काम करीत आहे. सुबत्ता असताना सारेच मदत करतात. पण कोणी संकटात असताना मदतीला धावून जाणे फक्त भारताचा स्वभाव आहे. भारताच्या विकासाच्या संकल्पनेत असंतुलित प्रगती नाही. मात्र पाश्चात्यांनी भारतावर विकासाचे एकांगी मॉडेल लादण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चूक लक्षात आल्यावर तेदेखील बदलले. प्रत्येक देशाने आपापली गरज लक्षात घेऊन विकासाची दिशा ठरविली पाहिजे, असे भागवत म्हणाले.  

सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा - राज्यपाल 
भारत जगात आर्थिक बाबतीत पाचव्या क्रमांकावर गेला आहे. सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजना व विकासकामे पूर्ण करण्यात सहकार्य करून याचा लाभ समाजातील गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घ्या, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी उपस्थितांना केले.  

Web Title: Countries like America and China help others out of selfishness rss chief Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.