देशाचा बजेट संतुलित, उद्योगांना संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:14 AM2018-02-02T00:14:18+5:302018-02-02T00:15:54+5:30
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प संतुलित आणि लघु व मध्यम उद्योगांना संधी देणारा असल्याचा सूर वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटनी (सीए) येथे काढला. सीएंनी काही मौलिक सूचना यावेळी केल्या. कर विषयक विशेष घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या, असेही मत सीएंनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प संतुलित आणि लघु व मध्यम उद्योगांना संधी देणारा असल्याचा सूर वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटनी (सीए) येथे काढला. सीएंनी काही मौलिक सूचना यावेळी केल्या. कर विषयक विशेष घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या, असेही मत सीएंनी व्यक्त केले.
प्रत्यक्ष करावर सीए कपिल बहरी म्हणाले, काही ठोस तरतुदींमुळे अर्थसंकल्प उत्तम आहे. अर्थसंकल्पामध्ये पूर्वपरिवर्तनीय दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. त्यांनी इक्विटी आणि म्युच्युअल फंडांवर दीर्घ मुदतीचा कॅपिटल गेन टॅक्स आणि त्यावरील गुंतागुंतीची माहिती दिली. त्यांनी ई-मूल्यांकनात असलेल्या जटिलतेबद्दल आपले विचार मांडले. अप्रत्यक्ष करावर सीए आनंद ढोखा यांनी मत मांडले.
कॅपिटल बाजारावर सीए रणजित दाणी यांनी भाष्य केले. भविष्यात इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. त्यांनी सरकारची प्रशंसा केली. सरकारने खर्च कमी केलेला नाही आणि पूर्वीच्या तरतुदींमध्ये सुरू असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. त्यामुळे सामान्य जनतेच्या नजरेत सरकारचे पतधोरण वाढेल.
सीए सुरेश राठी यांनी व्यापार आणि उद्योगावर विचार व्यक्त केले. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी जीडीपी विकास आठ टक्के असावा. दीर्घकाळात अधिक आर्थिक व्यवहार्यता असलेल्या नवीन क्षेत्रांत उद्योग उभारण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह यांनी वित्त विधेयक-२०१८ वर मत मांडले.
तत्पूर्वी सीए नागपूर संस्थेचे उपाध्यक्ष उमंग अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अर्थसंकल्पातील तरतुदींचा प्रमुख उद्देश प्रगतिशील विकासशील अर्थव्यवस्थेकडे आहे. नवीन भारतासाठी सामाजिक सुरक्षिततेवर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
सीए समीर बाकरे आणि सीए मिलिंद पटेल या सीए संस्थेच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी कार्यक्रमाचे प्रभावीपणे संचालन केले. सीए नागपूर शाखेचे सचिव सुरेन दुरगकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमात सीए स्वप्निल घाटे, सीए किरीट कल्याणी, सीए संजय एम अग्रवाल, सीए जितेन सागलानी, सीए संजय अग्रवाल, सीए साकेत बगडिया, ओ.एस. बगडिया, प्रेम आशुतोष, इशा उमभरकर आणि १८० पेक्षा जास्त चार्टर्ड अकाऊंटंट उपस्थित होते.