देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला, कोर्टाने निकाल पुढे ढकलला

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 5, 2023 03:23 PM2023-09-05T15:23:51+5:302023-09-05T15:24:39+5:30

आधी ५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार होता

court postpones verdict on case against Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला, कोर्टाने निकाल पुढे ढकलला

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध खटला, कोर्टाने निकाल पुढे ढकलला

googlenewsNext

नागपूर : निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही म्हणून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल खटल्यावरील निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. या निकालासाठी आता ८ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे. आधी ५ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार होता.

न्या. संग्राम जाधव यांच्यासमक्ष या खटल्याची सुनावणी झाली आहे. नागपुरातील ॲड. सतीश उके यांनी हा खटला दाखल केला आहे. फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे उके यांचे म्हणणे आहे.

Web Title: court postpones verdict on case against Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.